Home Breaking News सिल्वर ओक वरील हल्ला निषेधार्ह – पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

सिल्वर ओक वरील हल्ला निषेधार्ह – पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

200

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.9एप्रिल):- कुणाच्या घरावर हल्ला करणे म्हणजे भ्याड राजकारण होय. राजकारणाची पातळी फार घसरली आहे, रिपाई डेमोक्रॅटिक पक्ष सिल्वर ओक वरील हल्ल्याचा जाहीर निषेध करत असल्याचे मत राष्ट्रीय महासचिव डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केले.*

कोणत्याही समस्या असो न्यायिक आंदोलनाने त्या सुटायला हव्या, विरोध प्रदर्शन करणे संविधानिक अधिकार आहे मात्र; तो लोकशाही मार्गाने करायला हवा. एस टी कर्मचाऱ्याच्या मागण्याचे समर्थन करत असलो तरी त्यांच्या कृतीचा जाहीर निषेध करत असल्याचे मतं डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केले.

2 वर्षा नंतर भीम जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार असून कुण्या राजकीय व्यक्तीच्या घरावर जय भीम चे नारे देत हल्ला करणे म्हणजे लोकशाही चे तीन तेरा करणे होय. यामुळे जातीय तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. देशात आणी राज्यात कायदा सुव्यवस्था ढसाळली असून विरोधी पक्ष नाही च्या बरोबर आहे.

जय भीम चा नारा आंदोलना साठी वापरला पाहिजे कारण तो प्रेरणास्रोत आहे. नाही की कुणाच्या घरावर हल्ला करण्यासाठी, वृत्ती प्रवृत्ती आणी झालेल्या कृतीचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्ष जाहीर रित्या निषेध व्यक्त करत असुन् सदर प्रकरणा चा तपास होऊन मूळ सूत्रधार शोधावा असे मत विद्रोही पत्रकार पॅन्थत डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केली.

Previous articleश्री श्री श्री जानकी राम मंदिर नकोडा येथे राम जन्मस्तोव होणार साजरा
Next articleनायगावची बाल कलावन्त कु. सोनाली भेदेकरची लावणी होट्टल म्होस्तवात सादर होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here