



✒️आष्टी प्रतिनिधी(सौ. सरस्वती लाड)
आष्टी(दि.9एप्रिल):-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विकास कामांना चालना देणारा व कार्यकर्त्यांना बळ देणारा पक्ष आहे, आपले आ. बाळासाहेब आजबे हे शांत चित्ताने प्रश्न मांडून विकास निधी खेचून आणतात त्याचा मी साक्षीदार आहे. खुंटेफळ योजनेसाठी आ. बाळासाहेब आजबे यांनी सततचा पाठपुरावा करून काम मंजूर करून घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आमदार बाळासाहेब आजबे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे खुंटेफळ साठवण तलावाचे काम लवकरच सुरू होईल आणि एवढेच नाही तर आपल्या मतदारसंघाला त्यामुळे शाश्वत पाणी मिळणार असल्याचे नामदार जयंत पाटील यांनी आष्टी येथे राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्यात बोलताना सांगितले.
आष्टी येथे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाली साईदत्त मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, आष्टी- पाटोदा – शिरूर मतदार संघाचे लाडके आमदार बाळासाहेब आजबे काका, युवक प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख, माजी आ. साहेबराव दरेकर नाना, जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष जयसिंग भैय्या सोळंके, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष नरेंद्र काळे, सरजी चव्हाण, रेखाताई फड, माजी जि. प. अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत, किशोर हंबर्डे, सतीश आबा शिंदे, परमेश्वर शेळके, अण्णासाहेब चौधरी, शिवभूषण जाधव, विश्वास नागरगोजे, दीपक दादा घुमरे, विठ्ठल आप्पा सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना नामदार जयंत पाटील म्हणाले की आमदार बाळासाहेब आजबे हे आपल्या मतदारसंघाला मिळालेले एक विकास पुरुष आहेत. खुंटेफळ योजनेसाठी त्यांनी मोठा वेळ देऊन पाठपुरावा करून काम मंजूर करून घेतले आहे. सात टीएमसी पाणी बीड जिल्ह्यासाठी देण्यात येणार असून त्यातील १.६८ टिएमसी पाणी खुंटेफळ साठवण तलाव योजनेतून मिळणार आहे,७२ किलोमीटरची पाईपलाईन योजना असल्यामुळे या योजनेच्या कामाला वेळ लागेल पण शाश्वत पाणी मिळेल असा शब्द यावेळी मी देतो, पक्ष बांधण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी वेळ द्यावा, कमिटी व कार्यकर्त्यांच्या सतत संपर्कात राहून त्यांची कामे मार्गी लावली पाहिजेत. राष्ट्रवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गावागावातील बारीकसारीक कामे मार्गी लावून सामान्य जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महिलांना सन्मान देणारी पार्टी असून महिलांनीही सक्रीय होणे गरजेचे आहे.
आमचे दैवत पवार साहेबांच्या घरापर्यंत जाणारांचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध करावा. यामागे कोणाचा हात आहे हे शोधून काढू व खरा चेहरा समोर आणू हे षड्यंत्र कोणाचे आहे हे सर्व जनतेला माहीत असून खरा चेहरा समोर आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आहे त्यासाठी आम्ही निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बांधणीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी वेळ द्यावा असे आवाहन शेवटी ना. जयंत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातील विचारवंताचा पक्ष आहे, महाराष्ट्र मध्ये पक्षबांधणीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू असून या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी बुथवाईज बांधणी करण्यात येणार आहे.
जयंत पाटील यांच्यामुळे लवकरच आपल्या मतदारसंघाला खुंटेफळ साठवण तलावाचे काम सुरू होणार आहे, कडा कारखाना सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीतील वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करावा आम्ही आपणास सर्वतोपरी सहकार्य करू. गावागावात बूथ कमिटी तयार असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने काम करत आहे. आज पर्यंत माझ्या मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल मी खास करून सर्व जनतेच्या वतीने आपले आभार मानतो व यापुढेही मोठ्या प्रमाणात निधी देताल अशी अपेक्षा बाळगतो असे शेवटी आमदार आजबे म्हणाले.
माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांनी सांगितले की भाजपाने सत्तेचा दुरुपयोग करून चांगल्या माणसाच्या मागे इडी लावली आहे. पवार साहेब हे मोठ्या उंचीचे नेते आहेत. पक्षबांधणीसाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख बोलताना म्हणाले की राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सिंदफना प्रकल्पातील पी डी एन साठी ४५ कोटी रुपये मंजूर केले असून मराठवाड्याला पाणी मिळावे यासाठी ते प्रयत्नशील असतात. आमदार बाळासाहेब आजबे काका आमदार झाल्यापासून हा मतदारसंघ भयमुक्त झाला आहे. चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी व आष्टी – पाटोदा – शिरूर मतदार संघ भयमुक्त करावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी शिवाजी नाकाडे, महादेव डोके, भाऊसाहेब घुले, बी. एन. चाचा मुटकुळे, शिवाजी शेकडे, आजिनाथ गळगटे, संदीप अस्वर, काकासाहेब शिंदे, शिवाजी डोके, हरी भाऊ दहातोंडे, नवनाथ तांदळे, अशोक पोकळे, महादेव महाजन, नीलाताई पोकळे, सोनाली ताई येवले, जयाताई गुंड, शिंदे ताई, अविनाश सानप, युवराज झुणगुरे, शामराव फसले, नगरसेवक नाजिम शेख, संतोष सुरोशे, महादेव शिखरे, अमोल चव्हाण, बाबुराव जिरफे, दिनेश गडेकर, नसीर भाई शेख, भीमराव गायकवाड, डॉक्टर सुनील गाडे, सावता कातखडे, रामदास उदमले, सुरेश जगताप, मच्छिंद्र मुळीक सर, समिरज जाठोत. म्हातारदेव गर्जे, बाबा भीटे, सुभाष वाळके, अर्जुन काकडे, मुरलीधर शेकडे, ताराचंद कानडे, बाळासाहेब गर्जे, राजू जरांगे, दीपक पिसाळ, संजय गुंड, राजु परकाळे, श्रीराम गोंदकर, बाबा वाघुले, सोपान पवार, नामदेव शेळके, गोकुळ सव्वाशे, बबन काळे, गोल्हार मुकादम, दिलीप चव्हाण, सुभाष यंपुरे,धर्म जायभाय, सिद्धेश्वर झांजे, अण्णासाहेब लवांडे, विजय आमले, अनिल मोहिते, दादा पांडुळे, महाडीक सर यांच्या सह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकासाहेब शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संदीप सुंबरे यांनी मानले.


