Home महाराष्ट्र उद्यानामधील नवीन अभ्यासिका विध्यार्थ्यांसाठी ताबडतोब सुरू करा..!

उद्यानामधील नवीन अभ्यासिका विध्यार्थ्यांसाठी ताबडतोब सुरू करा..!

143

🔸नगरपालिकेला उदघाटनासाठी मुहूर्त सापडेना..!

🔹अन्यथा विद्यार्थ्यांचे हस्ते उदघाटन करु ; पुरोगामी युवा ब्रिगेड चा आंदोलनाचा इशारा

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.8एप्रिल):-शहरातील राजे संभाजी महाराज उद्यानामधील नव्यानेच बांधकाम झालेली अभ्यासिकेच्या उदघाटनाचा मुहूर्त नगर पालिकेला सापडत नसून उदघाटनाअभावी अभ्यासिका अद्याप विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली नाही.

येत्या सात दिवसात अभ्यासिका विध्यार्थ्यांसाठी खुली न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पुरोगामी च्या कार्यकर्त्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

नगर पालिकेच्या जुन्या अभ्यासिकेत विध्यार्थी आसन क्षमता ही कमी असल्यामुळे अनेक विद्यार्थी हे तिथे प्रतीक्षा यादीत आहेत.

अभ्यासिकेत जागा कमी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून नवीन बांधकाम झालेली अभ्यासिका ही तयार असून सुद्धा नगर पालिकेला अभ्यासिका सुरु करण्यासाठी उदघाटनाचे मुहूर्तच सापडत नसल्याचे दिसत आहे.

उदघाटनासाठी टाळाटाळ होत असल्याचे पाहून पुरोगामी च्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात मुख्याधिकारी यांची भेट घेऊन नवीन अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करावी यासंदर्भाचे निवेदन दिले.

येत्या सात दिवसात अभ्यासिका सुरू न केल्यास पुरोगामी युवा ब्रिगेड तर्फे विद्यार्थ्यांच्या हस्तेच उदघाट्न करून सदर अभ्यासिका सुरू करण्यात येईल व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी दिला.

यावेळेस पुरोगामी युवा ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष शिवशंकर सुरोशे, शाहरुख पठाण, शहर प्रभारी ज्ञानेश्वर लोखंडे, शहराध्यक्ष शुभम जवळगावकर, अनिकेत ताजवे, प्रफुल्ल दिवेकर, अंबादास गव्हाळे, आकाश रुडे, रुपेश टिंगरे, दत्ता दिवेकर, सिद्धार्थ दिवेकर, शुद्धोधन दिवेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here