



🔹राष्ट्रीय समाज पक्ष वणीचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना तहसीलदार साहेब मार्फत निवेदन
✒️वणी(पुरोगामी न्युज नेटवर्क)
वणी(दि 9एप्रिल):- महाराष्ट्राच्या काही विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ परीक्षा लेखी घेणार असल्याने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रक निघाले असताना.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेलं नसताना, राज्य शासन हे ऑनलाईन परीक्षा देण्याच्या बाजूने असताना आतापर्यंत विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमांचा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या असताना कॅरिऑन प्रवेशित विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा घेतल्या जातात हा प्रश्न प्रकर्षाने उपस्थित होत. अनेक विद्यापीठांमध्ये विविध जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात परंतु सध्याला होस्टेल मेस हे सर्व बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे.
जर कोणी विद्यार्थी प्राध्यापक कोरोना पॉझिटिव्ह आला यांची जबाबदारी कोणाची असेल?, असा प्रश्न अनिकेत चामाटे यांनी विचारला आहे. विविध मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.१.ऑफलाइन आणि ऑनलाइन परीक्षा घेताना पेपर हे ५०% ऑब्जेक्टिव्ह ५०% डिस्क्रिप्टिव्ह अशा प्रकारे घेण्यात यावे.२.सर्व शाखेच्या परीक्षा ह्या ऑफलाइन सोबत ज्या विद्यार्थ्याना सेंटरवर प्रत्यक्षरीत्या हजर राहणे शक्य होणार नाही अशा विद्यार्थयाांसाठी ऑनलाईन देखील घेण्यात याव्यात.
३.सर्व कॉलेजेने विद्यार्थयाांना असाइनमेंट देऊन त्याचे गुण देखील कॅल्क्युलेट करून विचारात घेतले जावे.४.सर्व शाखेच्या विद्यार्थयाांच्या परीक्षा घेताना परीक्षेच्या पॅटर्न मध्ये समानता असावी.विद्यार्थी मागील सात-आठ महिन्यांपासून केंद्र सरकार व यूजीसीच्या आडमुठे धोरणामुळे विद्यार्थी हा संभ्रमात सापडलेला आहे. तसेच विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो म्हणून शासनाने हा निर्णयात लवकर बदल करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा प्रमुख अनिकेत चामाटे यांनी निवेदनाच्या माध्यमातून केल्या आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते साई नालमवार उपस्थित होते.


