




✒️पूणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)
पुणे(दि.8एप्रिल):-भगवान महावीर जन्म कल्याणक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंच दिवसीय कार्यक्रम आज दिनांक 8 एप्रिल 2022 पांजरपोळ भोसरी येथे अंध विद्यालयात कवितांचा व गाण्याचा बहारदार कार्यक्रम झाला .यामध्ये सहभागी स्वानंदच्या अध्यक्षा सुनीता बोरा,कल्पना कर्नावट ,साधना टाटिया, लता पगारिया, सुनिता गुगळे, कीर्ती कर्नावट ,नितल फुलपगार, साधना सवाने, सौ. सुजाता नवले ,कुसुम भंडारी, वर्षा टाटिया, कल्पना कर्नावट सौ. कांते इत्यादी महिला , तसेच प्रा. अशोक पगारिया, प्रा. प्रकाश कटारिया, पी.एम . जैन, सुभाष सुराणा, प्रा. सुरेखा कटारिया ,प्रीती सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होत्या.
त्यांनी आपल्या विचारांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. तसेच कवितांची जुगलबंदी सादर करण्यात आली.दानाचे महत्व जाणून सांगितले
“दान देने से रुपया जाता है लक्ष्मी नही ,घडी बंद करने से घडी बंद होती है समय नही,झूट छुपाने से झूठ छुपता है सच नही,माना दुनिया बुरी है सब जगह धोका है ,लेकिन हम तो अच्छे बने और अच्छे बनने के लिए अच्छे कर्म करे जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान,यह है भगवान महावीर का तत्वज्ञान है. इस कविता के शृंखला मे दान का महत्व जानते हुए स्वानंद महिला संस्था की ओर से अंध स्कूल को महावीर जयंती के दिन कल्पनाजी कर्नावट भोजन मिती ली सुनिता गुगळे और वर्षा टाटिया इन्होने अपना आर्थिक योगदान देने की इच्छा प्रकट की.अध्यक्षस्थानी कवी राजेंद्र सोनवणे होते. ते म्हणाले, जीवनात कधी हार मानू नका. प्रयत्न करत राहा. यश आपलेच आहे. या बहारदार कार्यक्रमानंतर अंध विद्यार्थ्यांना मिष्ठान्न व भोजन देण्यात आले.साधना टाटिया व साधना सवाने यांनी सूत्रसंचालन केले. व सुरेखा कटारिया यांनी प्रस्तावना केली.अंध विद्यार्थ्यांनी गाणे गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.




