



✒️नायगाव तालुका,प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)
नायगाव(दि.8एप्रिल):- तालुक्यातील बेटकबिलोली येथिल हनुमान मंदिराच्या भव्य पटांगणात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दि 10/04/2022 ते दि 17/04/2022 पर्यंत रामनवमी व हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमंत भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अखंड हरिनाम सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पाहटे 4 ते 6 काकडा 6ते 9 पारायण 10 ते 12 गाथा भजन दुपारी 2 ते 5 श्रीमंत भागवत कथा 5 ते 6 हरिपाठ 6 ते 8 पंगत प्रसाद 8 ते 11 हरिजागर ह.भ.प.भागवताचार्य योगेश महाराज अग्रवाल वसमतकर याच्या रसाळ आम्रतवाणीतून..श्रीमंत भागवत कथा ऐकायला मिळणार आहे.
व सोपान महाराज, संतोष महाराज, बाबू महाराज विजय महाराज याचे सहकार्य लाभणार आहे दि 16/04/2022 रोजी ठीक 9 ते 11 ह.भ.प.योगेश महाराज अग्रवाल वसमतकर याचे किर्तन दि 17/04/2022 रोजी.सकाळी 8 ते 11 काल्याचे किर्तन ह.भ.प. भानुदास महाराज सावळेश्वरकर याचे होणार असून सप्ताहात दररोज महाप्रसाद होणार आहे तरी परिसरातील भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावे असे आवाहन समस्त गावकरी मंडळ बेटकबिलोली याच्या वतीने करण्यात आले आहे….





