



✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.8एप्रिल):- शहरातील बरेच वार्डात पाणीटंचाई पाहता नागरिक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रमुख प्रभागात पाण्याची समस्या आहे. महिला, वृद्ध, लहान मुले पाण्यासाठी वणवण भटकत आहेत मात्र आजतागायत संबंधित विभागाने पाण्याचा प्रश्न सोडवला नाही का?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात राजकारण शिगेला पोहोचले आहे.
त्यांची नौटंकी शहरात चांगलीच गाजत असून, त्यामुळे आता नागरिक त्रस्त झाले आहेत. घुग्घुस येथील बरेच वार्डात प्रभागात गेल्या बरेच दिवसांपासून पाणीटंचाई आहे. घरांमध्ये पाणीटंचाई का, बोअरिंग, विहिरीकडे नागरिकांची धावपळ सुरू आहे. दिवसेंदिवस तपनओस पडत आहे,आणि मुख्य पाणी जीवनस्तर असल्यास पाणीटंचाई भागविण्यासाठी परिसरात टँकरद्वारे पुरेशा प्रमाणात नळ पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकात वारंमवार करीत आहे.


