Home महाराष्ट्र श्री .सत्यसाई सेवा समिती पुसद पक्षीमित्र विभागातर्फे पक्ष्यांसाठी तृष्णातृप्ती

श्री .सत्यसाई सेवा समिती पुसद पक्षीमित्र विभागातर्फे पक्ष्यांसाठी तृष्णातृप्ती

198

🔸मांडवा येथे पाखरांसाठी केली पाणीपोईची व्यवस्था

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.7एप्रिल):-सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे.याचा फटका ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.जसे की ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण भटकंती होत असते. तसेच जंगलातील पाणी आटल्याने पाखरांची धाव ही शहरांकडे आहे.

ही बाब लक्षात घेऊन पुसद श्री .सत्यसाई सेवा समिती गेल्या आठ वर्षापासून उन्हाळ्यात पक्षांना पाण्याची व्यवस्था करीत आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी जेट किड्स इंग्लिश मीडियम स्कूल व ज्योतिर्गमय इंग्लिश मीडियम स्कूल तसेच प्रत्येक एक पक्षी मित्र सेवाकरांच्या घरांच्या आजुबाजूला झाडांना शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एकुण ४० एलण्या बांधून पाण्याची व्यवस्था केली .

श्री. सत्यसाई सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. संदिप चव्हाण मांडवा येथे वैद्यकीय सेवा देतात . श्री सत्यसाई सेवा समिती पक्षीमित्र विभागाच्या अंतर्गत आज दि.७एप्रिल २०२२ रोजी तहानलेल्या पाखरांसाठी मांडवा गावातील पिंपळ, लिंब या झाडावर पाणीपोईची व्यवस्था केल्यामुळे . पाखरे पाणी पिवुन आपली ताहान भागवत आहेत.हे कार्य पाहून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करित आहेत.

यावेळी रुख्माबाई पाईकराव ,प्रभाकर ढोले, गणेश ढोले, शिध्दार्थ ढोले, दयाशिल ढोले तसेच ग्रामस्थांनी पाणीपोई लावण्यासाठी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here