Home महाराष्ट्र सम्राट अशोकाचा भारत निर्माण करायचा आहे!

सम्राट अशोकाचा भारत निर्माण करायचा आहे!

251

सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासात सर्वांत महान सम्राटांचे स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. भारताच्या इतिहासात असे अनेक चक्रवर्ती सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये रामायण, महाभारत इत्यादी आहेत प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील अशोक हा शेवटचा चक्रवर्ती सम्राट झाला त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही.म्हणूनच मान्यवर कांशीराम आपल्या कॅडरबेस कार्यकर्त्यांना नेहमी सांगत होते बहुजन समाज पार्टीला सम्राट अशोकाचा भारत निर्माण करायचा आहे.तो विचार करणारा कॅडरबेस कार्यकर्ता आणि त्याचा पक्ष आता इतिहासात गेला.सम्राट अशोकाच्या २३२६ व्या जयंती निमित्याने म्हणजेच ९ एप्रिल २०२२ या दिवसाच्या निमित्याने हा लेखप्रपंच

चक्रवर्ती सम्राट अशोक (जन्म इ.स.पू ३०२,तर मृत्यू इ.स.पू २३२) हे मौर्या घराण्यातील महान व प्रसिद्ध सम्राट होते. त्यांनी अखंड भारतावर इ.स.पू २७२,ते इ.स.पू २३२. दरम्यान राज्य केले. हा भारतीय समाजातील सर्वात महत्वाचा लोककल्याणकारी राजा ज्याने अर्धा आशिया खंड काबीज केला होता. आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान थोडा इराण पूर्वेकडील आसाम तर दक्षिणेकडील म्हैसूर पर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला.अनेकांच्या मतानुसार,सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते. सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात ही सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते.

सम्राट अशोकांना ‘चक्रवर्ती सम्राट’ असे म्हणतात, चक्रवर्ती सम्राट म्हणजे ‘सम्राटांचा सम्राट’. जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे. असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील सम्राट अशोक हेच असे पहिले आणि शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही. सम्राट अशोकांनी अखंड भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले. अनेक देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. अत्यंत शूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक ही युद्ध हरले नाहीत. कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. त्यांच्या राज्याचे केंद्रस्थान ज्याला बिहार म्हणतात तो मगध होता, व आज पटणा म्हणून ओळखली जाणारी पाटलीपुत्र ही त्यांची राजधानी होती. कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धम्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारास समर्पित केले. सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरवला होता. अशोकांच्या संदर्भातील अनेक शिलालेख आज ही भारताच्या काना कोपऱ्यात सापडतात. त्यामुळे अशोकांबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे. सम्राट अशोक सत्य,अहिंसा,प्रेम सहिष्णूता आणि शाकाहारी जीवनप्रणीली यांचे थोर पुरस्कर्ते होते म्हणूनच एक अतिशय परोपकारी प्रशासक अशीच इतिहासात त्यांची ओळख व नोंद झाली आहे. अशोकाने आपल्या प्रजाजनांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या शीलालेखातून काही राजाज्ञा दिलेल्या आहेत. अशोकाचे शिलालेख हे मौर्य इतिहासाचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. सर्वप्रथम ब्रिटिश अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांना अशोकाचे शिलालेख वाचता आले. ते अनेक भाषांचे अभ्यासक होते.

अशोकाचे शिलालेख हे ब्राह्ममी,खरोष्टी आणि अरेमाइक या तीन लिपींमध्ये आढळलेले आहेत. त्यातील अनेक अभिलेख हे ब्राम्ही लिपीतील असून ते जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले, त्यातूनच या चक्रवर्ती सम्राटाच्या आयुष्याची आणि एकूणच मौर्य साम्राज्या विषयीची सखोल माहिती ही अभ्यासकांना मिळालेली आहे अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये स्वतःला ‘देवानाम प्रिय’ असे संबोधले आहे. कलिंग युद्ध कलिंग युद्धानंतर त्याचे झालेले मनपरिवर्तन, त्याने स्वीकार केलेल्या बौद्धधर्म, बौद्ध धर्माची तत्वे आणि एकूणच धर्मप्रसाराचे कार्य महामात्र यांची नेमणूक या सर्व घटनांचा उल्लेख हा शिलालेखात आलेला आहे. सम्राट अशोक हा या काळातील भारतातील पहिला चक्रवर्ती राजा होय सम्राट याचा अर्थ ज्याचा रथ घोडा चारी दिशांना कुणीही अडवू शकत नाही असा पराक्रमी शासक व विजेता होय. सम्राट अशोकाने प्रशासकीय संदर्भाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले प्रशासनामध्ये महामांत्रा हे पद निर्माण करून धर्मप्रसाराला उत्तेजन दिले आपल्या मुलांनादेखील धर्मप्रसारासाठी त्यांनी देशाबाहेर जाण्यासाठी प्रेरणा दिली प्रजा कल्याणाचे हेतूने अनेक उपक्रम हाती घेतले अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावून लोकांना आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला.

अशोकानंतर राज्याला योग्य उत्तराधिकारी न लाभल्यामुळे मौर्या साम्राज्याचा ऱ्हास घडून आला विशाल आणि एकछत्री केंद्रीकृत राज्य उभारण्याचा प्रयत्न अखिल भारतीय स्तरावर सर्वप्रथम मौर्य सम्राट यांनी केला यामध्ये चंद्रगुप्त आणि सम्राट अशोक यांची कार्य खूप महत्त्वपूर्ण राहिलेली आहे.अशोकाने बौद्ध धर्माची शिकवण देताना लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीला चालना दिली शांततेच्या मार्गाने कुठलेही राज्य जास्त काळ टिकू शकेल यावर त्याचा विश्वास निर्माण झाला बौद्ध धम्माच्या प्रसाराला त्याने चालना दिले त्यासाठी शासकीय अधिकारी नेमले स्वतःच्या मुलांना त्याने धर्म प्रसारासाठी पाठवले धम्मचक्र परिवर्तन करणारा अशोक हा प्राचीन भारतातील एक श्रेष्ठ व चक्रवर्ती शासक ठरला आहे इतिहासाला युगानुयुगे त्याची नोंद घ्यावी लागेल मानवी कल्याणासाठी पथक प्रयत्न करणारा प्रजा हीच दक्ष व प्रजा कल्याणकारी शासक म्हणून अनेक इतिहासकारांनी अशोकाच्या कार्याचा गौरव केलेला आहे.

सम्राट अशोकाने आपल्या कारकिदीतील पुढील वर्षांमध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले,जंगलामध्ये चैनीसाठी होणारी प्राण्यांची शिकारीवर बंदी आणली, प्राण्यांवर होणार्‍या कोणत्याही प्रकारची हिंसकतेवर ही बंदी आणली तसेच शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षा मिळालेल्या कैद्यांना अशोकाने सहिष्णूपणे वागवले. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे तसेच, शेतकर्‍यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या जातीधर्माच्या लोकांना सहिष्णुरीत्या वागवले जाई. तसेच अशोकाने आपले एकेकाळी ज्याच्यांशी युद्धे केली त्यांच्याशीही मैत्रीपूर्ण संबध वाढवले. सम्राट अशोकाने अनेक समाजोपयोगी कार्ये केली.अशोकाने आपल्या कारकीर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले, रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड ही अशोकाचीच कल्पना आहे, असे मानतात. आपण सम्राट असल्याच्या अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर अशोकाला धम्मअशोक असे म्हणू लागले. अशोकाने धम्माची प्रमुख आचारतत्त्वे विशद केली, अहिंसा, सर्व जातिधर्मांबद्दल सहिष्णुता, वडिलधार्‍या माणसांना मान देणे,संत,महात्मा, शिक्षकांना योग्य तो मान देणे, दासांना माणुसकीने वागवणे. अशा आचार तत्त्वांना जगात कोणताही समाज नाकारू शकणार नाही. अशोकाच्या इतिहासकारांनुसार त्याने कलिंगाच्या युद्धानंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही परंतु त्याला शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये, चोल साम्राज्ययाच्याशी त्याला नेहमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतु अशोकाने पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे अशोकने बौद्ध धम्म स्वीकारला तरी त्याच्या शेजारी राज्यांनी त्याला छेडण्याचे साहस केले नाही. तसेच बौद्ध धम्म स्वीकारला, अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाध्य ठेवले. अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती असे कळते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने केलेल्या ग्रीकांविरुद्धच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची कीर्ती ग्रीस, इजिप्तपर्यंत पोहोचली होती असे कळते.मग सम्राट अशोकाचा भारत बौद्धमय होण्यास वेळ का लागतो.

उत्तर भारतातील मागासवर्गीय ओबीसी बौद्ध धम्माकडे न जाता स्वतःला जास्तच सवर्ण समजत होते.जेव्हा अन्याय अत्याचार आणि भीषण हत्याकांड झाली तेव्हाच त्यांना आपण कोण आहोत आणि आपले पूर्वज कोण होते यांची आठवण होते.त्यांनी लोकसंख्येच्या बळावर राजकीय परिवर्तन घडविणे अपेक्षित असते.मान्यवर कांशीराम यांनी बौद्धधम्माची दिक्षा जाहीर पणे घेतली असती तर उत्तर भारत सम्राट अशोकाचा भारत झाला असता.त्यांची चूक उत्तर भारतातील ओबीसी नी सुधारली. आता मायावतीने कोणाचा आदर्श घ्यावा हे ठरविले पाहिजे. किती दिवस आर एस एस प्रणित भाजपाला धर्मपरिवर्तनाच्या धमक्या देणार?.आणि राजकारण करणार, करीत राहणार?.सम्राट अशोकाचा भारत बौद्धमय करण्यासाठी मागासवर्गीय ओबीसी तयार आहे हे देशातील धम्मदिक्षा सोहळ्यावरून दिसत आहे.इतिहास सांगतो वैशाली (बिहार) येथील अशोक स्तंभ अशोकाच्या ह्या कार्यात त्याला देवीपासून झालेल्या मुलांची मोठी मदत झाली.अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा ह्यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाउन तेथील राजाला बौद्ध धम्माची शिकवण दिली यामुळे भारतापुरते मर्यादित राहिलेला हा धम्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली. असे मानतात की अशोकाने बौद्ध धर्मीयांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली. त्यांतील काही स्तूपांचे अवशेष आजही पहावयास मिळतात. यातील मध्यप्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे, हा स्तूप अशोकाने बांधला आहे.मायावतीने असेच बुद्ध सम्राट अशोक,महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज डॉ भिमराव बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा सांगून ऐतिहासिक वास्तू जिल्हे, विद्यापीठ निर्माण केले पण धम्मदिक्षा का घेतली नाही?.राजकीय गणिते मांडत राहिल्यास अशोकाचा भारत बौद्धमय होईल काय?. हे देशभरातील भव्य धम्मदिक्षा सोहळे केवळ ढोंग आहेत असे म्हणल्यास चूक ठरणार नाही. आज देशात लोकशाही मार्गाने सत्ता काबीज करून लोकशाहीचा सरळ खून करण्याचे कारस्थान उघड उघड होत आहे.लोकशाहीची सर्व मूल्य पायदळी तुडवून ठोकशाही,हुकूमशाही निर्माण होतांना दिसत आहे.सम्राट अशोक ते छत्रपती शिवाजी,संभाजी महाराज यांना ज्या मनूस्मृती ने संपविले त्याचं पद्धतीने आज लोकशाही संपत आहे.म्हणूनच सम्राट अशोकाच्या २३२६ व्या जयंती निमित्याने म्हणजेच ९ एप्रिल २०२२ या दिवसाच्या निमित्याने विचारावेसे वाटते सम्राट अशोकाचा भारत निर्माण करायचा आहे.कसा आणि कधी?.करुणा महासागर सम्राट अशोकाच्या बुद्ध धम्म कार्याला कोटी कोटी विनम्र अभिवादन.

✒️लेखक:;सागर रामभाऊ तायडे भांडुप मुंबई(मो:-९९२०४०३८५९)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here