




🔸मिलिंद एकबोटे यांना यवतमाळ जिल्ह्यातील कार्यक्रमांना बंदी घालण्यात यावी!
✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.7एप्रिल):-यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील असोली येथील नियोजित असलेल्या मिलिंद एकबोटे यांच्या कार्यक्रमाला बंदी घालण्यात यावी याकरिता भीम आर्मी जिल्हा युनिट, तर्फे अशोक भालेराव यांच्या नेतृत्वात पुसद येथील उपविभागीय कार्यालय तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील प्रज्ञापर्व 2022 आयोजन समितीच्या वतीने बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुसद येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
परंतु मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जयंती उत्सव साजरी होऊ शकली नाही परंतु या वर्षी महाराष्ट्र शासनाने सर्व नियम शिथिल केल्याने या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचा मार्ग सुकर झाल्याने शहरातील व एकूणच तालुक्यातील वअत्यंत आनंदमय वातावरण आहे.प्रज्ञापर्व प्रबोधनात्मक उद्घाटकिय कार्यक्रमास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू मा. आदरणीय राजरत्न आंबेडकर पुसद येथील नियोजित दौऱ्यावर येत असून त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना असाव्यात या करिता पोलिस विभागाने संपूर्ण पुसद दौऱ्याचे निरीक्षण करून सुरक्षितेच्या दृष्टीने प्राथमिक उपाययोजना कराव्यात वरील विषयाच्या अनुषंगाने भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य सूत्रधार मिलिंद एकबोटे यांचा पुसद तालुक्यातील 8 एप्रिल 2022 च्या नियोजित कार्यक्रमामुळे येथील युवकांची माथी भडकवून दंगल होण्याची दाट शक्यता आहे?
त्यांच्या नियोजित कार्यक्रमास बंदी घालण्यात यावी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्राथमिक प्राधान्य देण्यात यावे.संपूर्ण यवतमाळ जिल्हा कार्यक्रम व प्रवेशास बंदी घालावी, काही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे भीम आर्मी जिल्हाध्यक्ष, यवतमाळ जिल्हा युनिट यांच्या वतीने निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.निवेदन देतेवेळी प्रमुख्याने, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष श्याम भाऊ देवकुळे, जिल्हा महासचिव धनराज कांबळे, तालुका उपाध्यक्ष अजय लोखंडे, शहर उपाध्यक्ष आकाश नेटके, शहर संघटक शेख फरहान, अक्षय राठोड, इत्यादी पदाधिकारी तथा कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.




