Home महाराष्ट्र भाजप जनसंपर्क कार्यालय नागभीड येथे भाजपा स्थापना दिवस उत्साहात साजरा

भाजप जनसंपर्क कार्यालय नागभीड येथे भाजपा स्थापना दिवस उत्साहात साजरा

200

🔹भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण ….

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.7एप्रिल):-जगात आज भारतीय जनता पक्ष हा समाजसेवेच्या विचारसरणीतून सर्वात मोठा पक्ष असून देशाच्या विकासाला एक नवी दिशा देणारा प्रबळ पक्ष म्हणून ओळखला जातो आहे.या पक्षाची स्थापना ६ एप्रिल १९८० ला झाली असून या पक्षासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय,शामा मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी,लालकृष्णजी अडवाणी,नरेंद्रजी मोदी यांचे सारखे महान नेतृत्व या पक्षाला लाभलेले आहेत. या पक्षाचा प्रमुख पाया म्हणजे भाजपा कार्यकर्ता हा आहे. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर भाजपा आज संपूर्ण जगात एक नंबरचा पक्ष आहे.

भाजपा पक्षात काम करत असतांना प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते यांना आपलं समजून भाजपा पक्ष जनतेची सेवा करण्याची संधी देत असते.हा पक्ष साधारण माणसाचा पक्ष असून येथे सर्वांना समान अधिकार आहेत. ह्या पक्षात काम करीत असतांना एक लहान कार्यकर्ता सुद्धा मेहनतीने पक्षाचे नेतृत्व करू शकतो असे प्रतिपादन भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मा.संजयजी गजपुरे भाजपा जिल्हा संघटन महामंत्री चंद्रपूर यांनी केलं.

भाजपा पक्षात लहान कार्यकर्ता म्हणून काम करीत मा.नरेंद्रजी मोदी जनतेची सेवा व पक्ष वाढीसाठी प्रयत्न करून आज देशाचे मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी आहेत. भाजपा पक्षात घराणेशाही ला विरोध असून प्रत्येक भाजपा कार्यकर्ते पक्षात मेहनतीने पक्षात नेतृत्व करण्याची संधी मिळवत असतात.भाजपा जनसंपर्क कार्यालय नागभीड येथे आज भाजपा पक्ष स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करून भारत माता व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना नमन करण्यात आले व भाजपा जनसंपर्क कार्यालय नागभीड येथे मोठया उत्साहात स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

स्थापना दिवस कार्यक्रम प्रसंगी:-
इंदुताई आंबोरकर अध्यक्षा तालुका महिला आघाडी,गणेश तर्वेकार उपाध्यक्ष न.प.नागभीड,सचिन आकुलवार बांधकाम सभापती न.प.नागभीड,शिरीष वानखेडे नगरसेवक,रुपेश गायकवाड नगरसेवक,अर्चनाताई मरकाम सभापती न.प.नागभीड,हरिभाऊ गरफडे सर ज्येष्ठ कार्यकर्ते, हेमंत नन्नावरे भाजयुमो शहर अध्यक्ष,टेनिग्रेग मसराम,प्रदीप धकाते,आनंद भरडकर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here