Home पुणे समाजसेविका राजश्री ताई राजेश तुडयेकर यांनी पारधी समाजातील चाळीस कुटुंबाना दत्तक घेतले.

समाजसेविका राजश्री ताई राजेश तुडयेकर यांनी पारधी समाजातील चाळीस कुटुंबाना दत्तक घेतले.

298

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.6एप्रिल):- स्नेहा उत्तम मडावी आदर्श माता शेवराआई ज्ञानदेव भोसले व ज्ञानदेव शिलेदार भोसले यांच्या हस्ते समाजसेविका राजश्री ताई यांचा सन्मान करण्यात आला. पारधी समाजाला पन्नास कुटूंबाना दिव्यांग व विधवा महिलांना किट वाटप करण्यात आले. नायगाव मध्ये हवेली तालुक्यात पुणे जिल्हामध्ये एक छोटंसं गाव मुळामुठा नदी किनारी वसलेलं सुंदर अश्या गावामध्ये ताईचा सन्मान झाल्याने हे मी आयुष्यभर विसरू शकत नाही हे माझे नशीब आहे.माझं स्वपन होत एक दिवस मी माझ्या आई वडिलांचे नाव रोशन करायचं त्यामध्ये माझं सांगली जिल्हामध्ये जन्म झाला अतिशय मी गरिबीतून दिवस पाहिले .

ज्या शालेय वस्तू टाईमवर मला मिळ्याल्या नाही म्हणून नेहेमी विद्यार्थीना वह्या पुस्तकं पेन दरवर्षी देत असते , व गरीब कुटूंबाना किट नेहमी देत असते. या वेळेस वेगळं करायच होत पारधी समाजाला कुणी मदत करत नाही जंगलात राहून शिकार करणारा हा समाज पारधी सजाला गावामध्ये अजूनही स्थायिक नाही घर जागा नाही शिक्षण नाही म्हणून त्यांना शिक्षण व त्यांचं खर्च स्वतः करणार अस सांगितलं. आज या नायगाव मध्ये पन्नास कुटूंबाना किट द्याचं ठरवलं आसे त्या भाषनामध्ये सांगत होत्या राजश्री ताई ने शासनाच्या योजना बद्दल माहिती दिली, शिलाई मशीन, मिरची कांडन, पिठाची गिरणी, ब्युटीपर्लर छोटे मोठे व्यवसाय करण्यास माहिती दिली तुमच्या जवळ जिद्ध असेन तर मोठया उद्योगजीका व्हाल.

पण पारधी कोळी दिव्यांग विधवा महिला चंद्रपूर काही आदिवासी महिला महातोबाची आळंदी खामगाव फाटा बारामती हे सगळे नायगाव ता. हवेली जिल्हा पुणे सिद्धेश्वर नगर सुरेखा तुकाराम भोसले यांच्या निवास्थानी पन्नास कुटूंबाना किट वाटप केले सांगली जिल्हाची कन्या राजश्री ने कर्नाटक राज्यामध्ये गरिबांना न्याय मिळून देणे प्रत्येक वेळी मदत करणे एक महिला असून 40 कुटूंबाना दत्तक घेतले आहे हे विशेष आदर्श घेण्यासारखे आहे.हे ताईंचे कार्य पाहून महाराष्ट्र चे महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते अवॉर्ड मिळाला असून राज्यश्री ताई राजेश तुडयेकर यांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.उपस्थित प्रमुख पाहुणे राजेश तुडयेकर, आदर्श माता शेवराई ज्ञानदेव भोसले ,ज्ञानदेव शिलेदार भोसले, तुकाराम ज्ञानदेव भोसले, समाजसेविका सुरेखा तुकाराम भोसले,सुजाता ज्ञानदेव भोसले, आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ चे उप आध्यक्ष पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले पत्रकार, स्नेहा उत्तम मडावी, प्रदीप सुतार, रेवण कुटे, मारुती दामामे, वैशाली भोसले, सचिन भोसले, साईप्रसाद महेंद्रकर अश्विनी आरंडे ,दादासो गायकवाड, नभी शेक ,भूपेंद्र माळी, शुभम सूर्यवंशी यांचे मनापासून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here