



✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.7एप्रिल):-मानिकगड पहाडावरील अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणून महाराष्ट्रात ओळखला जाणारा चंद्रपूर जिल्ह्यातील,तेलंगाना राज्यच्या सीमेला लागून असलेल्या जिवती तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पल्लेझरी येथील विद्यार्थ्यांची शिक्षणाची दुरवस्था जि. प. शाळेमध्ये जिवती तालुक्यातील महिला सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई राठोड यांनी दि.4 /4/2022रोजी स्वतः शाळेला भेट देऊन विध्यार्थ्यांशी सव्वाद साधल्या असता तेथील इयत्ता 5 वी व इयत्ता 6 वी च्या काही विद्यार्त्यांना लिहिता व वाचता पण येत नाही.
अशी दुरव्यवस्था पल्लेझरी गावात दिसून आली आहे.पाच शिक्षकां पैकी कधी दोन तर कधी तीन शिक्षक उपस्थित असतात शासनाचे दुर्लक्ष की, मुलांच्या भविष्याचा खेळ असा आरोपही सिंधूताई राठोड यांनी केला आहे.असंच चालत राहील तर आम्ही टोकाचे पाऊल उचलू आमच्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी





