




🔸१२४ किलो मीटर पांदण रस्त्यांमुळे शेतकऱ्यांची वहिवाट सुखद होणार !
🔹पांदण रस्ते पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांचा पुढाकार!
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.7एप्रिल):-शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणारे पांदण रस्ते त्वरीत पूर्ण करण्याच्या उद्देशाने आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील पांदण रस्ते खडीकरण करण्याकरिता पांदण रस्त्यांना मंजुरी देऊन निधीची तरतूद करून देण्याची मागणी रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री संदीपपान भुमरे यांच्याकडे केली हीती. आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी पांदण रस्ते योजने अंतर्गत सन २०२२ – २३ या वर्षाच्या आरखडयास ३ मार्च २०२२ रोजी शासन निर्णय काढून ५० किलो मीटरच्या ५० पांदण रस्त्यांना मान्यता देण्यात आली असून २९ मार्च २०२२ रोजी शासन निर्णय काढून मोर्शी वरुड तालुक्यातील ७४ किलोमीटर च्या ७४ पांदण रस्त्याच्या कामांना मंजुरात मिळाली आहे.
आमदार देवेंद्र भुयार यांचा शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणे हा जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्यांना शेतातील शेतमाल काढण्याकरिता व शेतात जाण्याकरिता पांदण रस्त्याची दुरावस्था पाहून शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी पांदन रस्ते योजना २०२२-२०२३ अंतर्गत मोर्शी वरुड तालुक्यातील १२४ पांदण रस्त्यांना मान्यता देण्यात आली आहे. काही दिवसात परिसरातील पांदण रस्ते मोकळे होणार असल्याने शेतकऱ्यांची वहिवाट सुखद होणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
यांत्रिकीकरणामुळे शेतामध्ये पेरणी, अंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रांमार्फत करण्यात येतात अशा यंत्र सामग्रीचा वाहतूक करण्याकरता पावसाळ्यातही शेत पांदण रस्ते सुयोग्य असणे काळाची गरज आहे .आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील पांदण रस्ते पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या दृष्टिकोनातून पांदन रस्ते योजना राबविण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने कामांचे नियोजन करण्यात आले आहे.
“मोर्शी वरुड तालुक्यात १२४ किलो मीटर पांदण रस्त्याची कामे मंजूर करण्यात आली असून बाकी पांदण रस्त्यांची कामे त्वरीत पूर्ण केली जातील, मोर्शी वरुड तालुका संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून शेतातील संत्रा काढण्याकरिता मोठे वाहन शेतात नेण्याकरिता अडचणींचा सामना करावा लागतो शेतकऱ्यांना वहिवाटीकरिता पांदण रस्त्यांची मोठी अडचण आहे. हीच अडचण लक्षात घेता मोर्शी तालुक्यातील संपूर्ण पांदण रस्ते मोकळे करून पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. — आमदार देवेंद्र भुयार .




