Home अमरावती नांदगाव खंडेश्वर येथे भाजपाचा स्थापना दिवस संपन्न

नांदगाव खंडेश्वर येथे भाजपाचा स्थापना दिवस संपन्न

273

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

🔸शहरातून काढण्यात आली भव्य रॅली

🔹विविध कार्यक्रमाचे करण्यात आले आयोजन

अमरावती(दि.7एप्रिल):-दिनांक सहा एप्रिल भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त नांदगाव खंडेश्वर शहरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले नांदगाव खंडेश्वर येथे भाजपा कार्यालयात दीनदयाल उपाध्याय व भारत मातेच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते हरिचंद्र पाटील खंडाळकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा सरचिटणीस राजेश पाठक व दिलीप मोरे यांचा युवा मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यानंतर भाजपा कार्यालय पासून बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली ही बाईक रॅली संपूर्ण शहरातून काढण्यात आली व समारोप बस स्टँड परिसरात करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दीपक तिखीले भारतीय जनता पार्टीच्या महिला तालुकाध्यक्ष मोनाली बाभुळकर शहराध्यक्ष नवल खीची युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे अविनाश भाऊ ब्राह्मणवाडे दिनेश सोनकुसरे नितीन काळे वाल्मिक इंगळे गणेश माटोडे अमित दहातोंडे अमर कदम वैभव केने अजगर भाई पठाण आशिष बेलसरे ऋषिकेश ढेपे ऋषिकेश खंडार वैभव तुपकर अमोल इंगोले नितीन जाधव आशिष रावेकर वेळूकर श्रीकांत तिडके रंजीत खंडाळकर काय मामा आसाम के पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here