Home महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेच्या बारामती, इंदापूर तालुक्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

पोलीस मित्र संघटनेच्या बारामती, इंदापूर तालुक्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

227

✒️बारामती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

बारामती(दि.7एप्रिल):-पोलिस मित्र संघटना गतिमान करण्यासाठी पुणे जिल्हातील बारामती तसेच इंदापूर तालुक्यात काही पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दुर्गा नवगिरे, भावेश रणदिवे, अमितकुमार शेलार यांची पोलीस मित्र संघटना बारामती, आणि इंदापूर तालुका अंतर्गत बारमती काटेवाडी येथील दुर्गा नवगिरे यांची सहसचिव पदावर तर काही जणांची सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली.

पोलिस मित्र संघटना क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या येणाऱ्या अडचणी सोडवत पोलिस मित्र संघटनेचे चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय संस्थापक दीपक कांबळे व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुशांत गोरवे यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रीय शिफारसीने राष्ट्राची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी पोलिस मित्र संघटनेचे ध्येय धोरणे लोकशाही भारतात या शाश्वत विकासासाठी राबवण्याची जबाबदारी आपणावर सोपवत आहोत.

सदर नियुक्ती दिनांक 1/11/2022 पर्यंत वैध असेल गुणवत्ता संघटनात्मक लोकाभिमुख कार्य आणि कार्यक्षमता पाहून पुढील मर्यादा व पदांचा विचार केला जाईल आपण कायद्याने संघटनेने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन करून भारतीय संविधानाला अभिप्रेत शाश्वत विकासासाठी सामाजिक न्याय व हक्कांसाठी बांधील राहील ही अपेक्षा आपणास आपल्या भावी वाटचालीसाठी स्वराज्य पोलीस मित्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुशांत गोरवे,शेखर मासाळ संपर्क प्रमुख पुणे जिल्हा पांडुरंग ढोले, विशाल डोंबाळे,महेश पांढरे, रोहन खोमणे, सौरभ मासाळ, रोहित डोईफोडे, रोहन काटे, आरती साबळे, प्रगती खाडे, सुभाष नवगिरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.मारूती बळीराम अडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील नियुक्त्या करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here