



🔹जयंतीचे निमंत्रण देतेवेळेस बाबासाहेबांबद्दल वापरली अपमानास्पद भाषा
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.6 एप्रिल):-सध्या 14 एप्रिल जवळ येत असल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी व्हावी यासाठी सर्वीकडे सध्या जोरदार तयारी सुरु असुन सर्व कामाला लागल्याचे दिसत असतांना बाबासाहेबांबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याची घटना विडुळ येथे घडली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती विडुळ चे काही पदाधिकारी विडुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले) येथील शिक्षकांना 14 एप्रिल च्या जयंतीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेले होते.
यावेळी तेथील शिक्षक अशोक गोविंदराव मुक्कावार ह्यांनी कोण बाबासाहेब? कोणती जयंती? मी त्यांना नाही ओळखत असे बाबासाहेबांबद्दल अपमानास्पद उदगार काढल्याचा आरोप उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
यासंदर्भात उमरखेड तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी गट विकास अधिकारी श्री प्रवीण कुमार वानखेडे यांची भेट घेऊन संबंधित अशोक गोविंदराव मुक्कावार या शिक्षकाची चौकशी करून निलंबित करावे अशी तक्रार दिली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती, विडुळ, उमरखेड, पुरोगामी युवा ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी, ऑल इंडिया पँथर सेना, भीम टायगर सेना चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





