



🔸जागा नियमानुकूल करण्याचा ग्रामसभेत ठराव मंजूर
🔹गट विकास अधिकारी खानंदे यांच्या हस्ते उपोषण मागे
✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193
अमरावती(दि.6एप्रिल):-तालुक्यातील शिवणी रसुलापुर येथील इंदिरा आवास घरकुलधारक व अतिक्रमण धारकांनी त्यांची राहती जागा त्यांच्या नावे नियमानुकूल करण्यासाठी व प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत कार्यालय शिवणी रसुलापुर समोर सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. गटविकास अधिकारी सतीश खानंदे यांच्या आदेशाने ग्रामपंचायत सचिव सुरेश भारसाकळे यांच्या लेखी पत्रानंतर उपोषण मागे घेण्यात आले.उपोषण मंडपाला भाकपचे राज्य सचिव तुकाराम भस्मे व महाराष्ट्रराज्य लालबावटा शेतमजूर युनियनचे विभागीय निमंत्रक संजय मंडवधरे यांनी भेट दिली उपोषण शकर्त्याच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या.
येथील उपसरपंच विनोद गोंडाणे व महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनचे बाबाराव इंगळे,लिलाबाई उपरीकर, महादेव शेंडे, भोपतराव सोनवने, रामराव आगरे, आकाराम मेश्राम, राधाबाई सळसळे,गोमाजी मेश्राम,फकिरा खडसे, सदाशिव केवट,लिलिबाई भोयर, पंचफुला शिंदे, इंदिरा शेंडे, शेवंता गोंडाणे, सुनिता शेंडे, संगिता धुमनखेडे,बेबीबाई बेरे, सुरेखा खडसे, उषा सोनोने,पुनम खंगार, जनाबाई सगळे,बेबी केवट, रूखमा उके,माया भोयर,जया केवट,रेखा मेश्राम, तुळसा गौरखेडे, दिपाली मेश्राम, रंजना मेश्राम,मिरा भोयर,बेबी मेश्राम, वर्षा खंगार यांच्यासह अनेकजण उपोषणास बसले होते. आंदोलनाचे संयोजन व व्यवस्थापन विनोद तरेकर,मनोज गावंडे, सोनाली वैद्य,लिलेश्वर आगळे, कोकिळा डोके, सुनंदा ढोके, दिक्षिता तरेकर,विनोद वैद्य, भानुदास मंदूरकर,अमित बोरकर,यश वैद्य यांनी केले.
शासनाच्या निर्णयानुसार घरकुलधारक व अतिक्रमणधारकांना त्यांच्या ताब्यातील जागा नियमानुकूल करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी दिनांक ४/४/२०२२ पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाची सुरवात केली होते.मौजे शिवणी रसुलापुर गट क्रमांक 46 व 47 मध्ये 1995/96 पासून वास्तव्य करीत 33 नागरिक हे कुळामातीच्या घरामध्ये वास्तव्य करीत आहेत तर 42 नागरिक त्यांना जागा नसल्यामुळे अतिक्रमण करून या ठिकाणी राहत आहेत. तसेच सर्वे नंबर 11 मौजे रसुलापूर (रामपूर) येथे 5. 83 आर मध्ये 28 घरकुलधारक राहत आहेत. या सर्व नागरिकांच्या जागा नियमानुकूल करण्यात येतील असा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला व हा ठराव संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येईल असे ठरविण्यात आले.
रस्ते विकास महामंडळाने येथील जागा अधिग्रहित केल्याने व त्यानंतर संबंधितांना पत्रव्यवहार केल्यानंतर तीन एकर जागा घरकुल धारकांसाठी आरक्षित केली आहे.सन 1995/96 मधील इंदिरा आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या घरकुलासाठी मौजा शिवणी सर्वे नंबर 46/47 मध्ये पाडलेल्या ले आऊट प्लॉटचे नमुना सातबारा वर नोंद करण्यात यावी. त्याची मोजणी सीट सादर करण्यात यावी. सन 2018 च्या पूर्वीपासून रहिवासी असलेल्या व ग्रामपंचायत कार्यालयाने भोगवटा लावून कराची आकारणी केलेल्या 33 नागरिकांपैकी १६ लोकांची नावे ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रपत्र ड मध्ये आहे. अशा नागरिकांना 30×30 चे प्लॉट देण्यात यावे व त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात यावा.1995 पासून येथे वास्तव्यास असलेल्या इंदिरा आवास घरकुल धारकांना ग्रामपंचायत कार्यालयात नोंद असलेल्या रेकॉर्ड नुसार त्यांच्या नावे जागा करण्यात यावी. तसेच उर्वरित ग्रामपंचायतीच्या रेकॉर्ड नुसार अतिक्रमणधारकांना त्यांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे.ज्यांना शासनाच्या इंदिरा आवास योजनेअंतर्गत व इतर आवास योजना अंतर्गत घरकुले मिळाली आहेत त्यांचे संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यात यावे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुलाचा लाभ मिळण्याकरता रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना त्यांच्या नावे जागा करण्याच्या व्यवहारातील शासकीय शुल्क माफ करण्यात यावे.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शासकीय जागा मिळण्यासाठी पाचशे स्क्वेअर फुट जागा देण्याचा नियम रद्द करून किमान पंधराशे स्केअर फुट जागा देण्यात यावी.मौजा शिवणी सर्वे नंबर 46/47 मध्ये पाटबंधारे विभागाचे शेततळे व क्रीडा संकुल असल्यामुळे ती जागा नवनगर मधून देण्यात यावी.सर्वे नंबर ४६/४७ मध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर असून त्यासाठी जागा राखीव करण्यात यावी. अशा प्रमुख मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या होत्या. शासन स्तरावरील मागण्या शासनास पाठविण्यात येतील असे ठरविण्यात आले.


