



✒️सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)
कोल्हापूर(दि.5एप्रिल):-गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील जितेंद्र तानाजी यशवंत यांच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक वंचित घटकांच्या विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन तामिळनाडू येथील इंडियन एम्पायर युनिव्हर्सिटीच्या युनिव्हर्सल डेवलपमेंट कॅन्सल कडून व्यवसाय व समाज क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी शिवाजी विद्यापीठ चे इतिहास परिषदेचे डॉ.धीरज सुरेश शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
जितेंद्र यशवंत हे गडमुडशिंगी च्या विकासासाठी अनेक वर्ष कार्य करत आहेत. एक वर्ष सरपंच व सध्या विद्यमान सदस्य म्हणून कार्यरत आहे. त्यांनी आत्तापर्यंत 200 पेक्षा अधिक रो बंगले उभारले आहे. त्यामध्ये गरीब आणि वंचित लोकांना सवलतीच्या दरात निवारा निर्माण करून दिला आहे. पूरपरिस्थिती व कोरोना सारख्या महाभयानक काळात त्यांनी अनेक लोकांची सेवा केली आहे.
याबद्दल त्यांना राज्य राखीव पोलीस दल, राठोड फाउंडेशन, सरपंच सेवा संघ, शिंगाडे ट्रस्ट अशा अनेक संस्था व फाउंडेशन कडून त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे.यशवंत यांना डॉक्टरट प्राप्त झालेली बातमी समजताच त्यांना डॉ. सुमित्रा भोसले पाटील, डॉ. सुरेश राठोड, संपादक सुरेश वाडकर, पत्रकार राजेंद्र चौगुले, मुदशिंगी गावचे ग्रामस्थ तसेच अनेक स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


