Home नागपूर ॲड.सतीश उकेंनी फोडला ED च्या अधिकाऱ्यांना घाम

ॲड.सतीश उकेंनी फोडला ED च्या अधिकाऱ्यांना घाम

372

🔹राज्यात ईडीने केलेल्या सर्व कारवाया योग्य आहेत का❓

🔸मग महाराष्ट्र राज्याच्या पोलीसांचे काम काय❓

✒️नागपूर प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

नागपूर(दि 5 एप्रिल):-ॲड.सतीश उके यांना ED च्या अधिकाऱ्यांनी अटक केली,आणि राज्यभर खळबळ उडाली.माध्यमांनी इथ देखील फडणवीसांच्या मिठाला जागत,”नाना पटोले यांच्या वकिलाला अटक”,अश्या पद्धतीच्या बातम्या चालवल्या. मुळात फडणवीसांना नडणारा माणूस म्हणून सतीश उके यांना दाखवल्यास उके मोठे होतील आणि फडणवीस यांच्या प्रतिमेला धक्का बसेल,अशी शक्यता होती.परंतु आपल्या मालकाच्या इज्जतीचा फालुदा होवू नये म्हणून,सर्वच भाटांनी सारवासारव करत उकेंना फक्त नाना पटोले यांचे वकील म्हणून रंगवले.आज उके यांना सन्माननीय PMLA कोर्टासमोर हजर करण्यात आले.ज्या कोर्टात हि सूनावणी होणार होती,ते कोर्ट गैरहजर असल्याने इन्चार्ज कोर्टाने ही सुनावणी घेतली.

ॲड.सतीश उके यांना 20 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.ज्यात काही लोकांनी सतीश उके यांच्यावर खोटे आरोप करत,त्यांनी फसवणूक केल्याची तक्रार होती.परंतु नंतर पोलीस तपासात हे तक्रार करणारी मंडळीच फ्रॉड असल्याचे निष्पन्न झाले. आणि पोलिसांनी देखील या प्रकरणात आपला B- फायनल अहवाल सादर करताना स्पष्ट सांगितले होते की,”ॲड.सतीश उके यांचा कोणताही दोष नाही..!”

दुसऱ्या एका प्रकरणात, एका बाईची उके यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार होती.या प्रकरणात तर सन्माननीय हायकोर्टाने सांगितले होते की,”यात चार्जशीट दाखल करू नका..!”आणि हा निर्णय फडणवीस सत्तेत असताना आला होता,हे विशेष मुळात ॲड.सतीश उके अनेक प्रकरणात फडणवीस यांच्या विरोधात उभे आहेत.वरील दोन्ही प्रकरणात कोणाचा हात असेल,हे यातून आपल्या लक्षात येवू शकते. ॲड.सतीश उके यांच्या तर्फे ॲड.रवी जाधव यांनी काम पाहिले.जाधव यांनी तर काही अश्या गोष्टी सांगितल्या,जे ऐकून कोणत्याही सद्सद्विवेक बुद्धी जागृत असणाऱ्या माणसाच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.

1. ॲड.जाधव हे सतीश उके यांचे वकील असून सुद्धा,ED च्या अधिकाऱ्यांनी जाधव यांना त्यांच्या अशिलास भेटू दिले नाही.
2. उके यांच्या सोबत जाधव यांची भेट होवू नये म्हणून,ED च्या अधिकाऱ्यांनी सतीश उके यांना ठेवण्यात आलेली जागा आणि वेळ चुकीची सांगितली,जेणेकरून उके यांना ते भेटू शकणार नाहीत.मुळात आपल्या आशिलास भेटण्यास मज्जाव करणे,आडकाठी करण्याचा अधिकार ED ला कोणी दिला…? ED चे अधिकारी नेमक्या कोणाच्या इशाऱ्यावर अस वागत होते..? असा प्रश्न आपल्या डोक्यात आल्याशिवाय राहत नाही. ॲड.सतीश उके यांनी कोर्टात सांगितले की,घरा पहाटे ED चे अधिकारी घरात घुसले.घरात घुसाताना त्यांच्या हातात AK-47 होत्या.एखाद्या अतिरेक्याला अटक करण्यासाठी आल्यासारखं या लोकांचं वागणे होते.घरातल्या लोकांना त्यांनी धमकावल देखील.

अटक करण्याच्या आधी संशयिताला ED ने समन्स देणे ही प्रोसेस आहे.मात्र उके यांना आधी अटक करण्यात आली आणि नंतर समन्स देण्यात आले.ED च्या अधिकाऱ्यांची ही वागणूक कोणत्या नियमात,कायद्यात बसणारी आहे..? हे विचारताना एकीकडे उके भावनिक झाले होते,आणि दुसरीकडे ED च्या अधिकाऱ्यांना मात्र घाम फुटला होता.मुळात ED ला, Foreign Exchange आणि Anti money Laundering act मध्ये एखाद्याला अटक करण्याचा किंवा तपासाचा अधिकार आहे.परंतु ॲड.उके यांना मात्र सिव्हील प्रकरणात ED ने अटक केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.मग सुज्ञ माणसाला हा प्रश्न पडतो की,ED अश्या प्रकरणात जर कार्यवाही करणार असेल तर पोलीस दल कशाला आहे..? पोलिसांची गरजच काय आहे नेमकी..?

ज्या दोन प्रकरणांचा उल्लेख कोर्टात ED ने केला आहे,त्या दोन्ही प्रकरणात वर सांगितल्या प्रमाणे निर्णय आलेले आहेत.
अस असताना देखील,ED ने नेमक्या कोणत्या अधिकारांचा आणि कायद्याचा वापर करत ॲड.सतीश उके यांना अटक केली आहे..? हे स्पष्ट होत नाहीये. किंवा येत्या 9 तारखेला,ॲड.सतीश उके यांनी,”निवडणुक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात फडणवीस यांनी खोटी माहिती दिल्याची” जी केस फडणवीस यांच्यावर टाकली होती,त्याचा निर्णय अपेक्षित असल्यामुळे,केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत ही खेळी खेळली आहे..? (Mohasin A. Shaikh.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here