Home महाराष्ट्र पत्रकार स्व. श्रीपती माने यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शिवकीर्तनकार डाॕ. गजानन वाव्हळ यांचे कीर्तन

पत्रकार स्व. श्रीपती माने यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शिवकीर्तनकार डाॕ. गजानन वाव्हळ यांचे कीर्तन

228

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.5एप्रिल):-तालुक्यातील डोंगराळ व अतिशय दुर्गम भागात जन्म घेतलेले श्रीपती संतराम माने यांनी आपल्या कष्टाचे व प्रमाणिकपणाचे जोरावर दैनिक झुंजारनेतात मानाचे स्थान प्राप्त केले होते. झुंजारनेता परिवारातील एक विश्वासु सदस्य म्हणुन ते ३५ वर्षे कार्यरत होते. निवासी संपादक म्हणुन पाच वर्षे राहिले. स्व. मोतीरामजी दादा वरपे, स्व. रत्नाकरभाऊ वरपे यांच्या समवेत त्यांची सावलीसारखे राहुन काम केलेले आहे. झुंजारनेताचा वटवृक्ष करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. विद्दमान युवा संपादक अजितदादा वरपे यांचे तर ते मार्गदर्शकच होते. त्यांच्या जाण्याने झुंजारनेता पोरका झाला आहे. कधीच भरुन न येणारे नुकसान झालेले आहे.

झुंजारनेताचा संपुर्ण परिवार पोरका झाला आहे.सहवास जरी सुटला,स्मृती सुगंध देत राहील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मानेसाहेब तुमची आठवण येत राहील. अशा शब्दांत सर्व पत्रकार वार्ताहर,वृत्तपत्र विक्रेते यांच्या भावना आहेत. आष्टी तालुक्याचे सुपुत्र दैनिक झुंजारनेताचे निवासी संपादक झुंजारनेताचा आधारवड, सर्व पत्रकारांचे मार्गदर्शक. स्व. श्रीपती संतराम माने यांंचे शुक्रवार दि. ८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता. प्रथम पुण्यस्मरण आहे. यावेळी झी टॉकीजचे पूणे येथील प्रसिध्द राष्ट्रीय शिवकिर्तनकार ह. भ.प. प्रा. डॉ. गजानन महाराज वाव्हळ यांचे कीर्तन होणार आहे. मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परसराम श्रीपती माने, महादेव खामकर, आजिनाथ खामकर, नवनाथ माने, भाऊसाहेब माने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here