Home बीड माजी जि.प.सदस्य युवराज डोंगरे यांनी दखल घेऊन केला स्वखर्चातुन रस्ता दुरुस्त

माजी जि.प.सदस्य युवराज डोंगरे यांनी दखल घेऊन केला स्वखर्चातुन रस्ता दुरुस्त

275

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

गेवराई(दि.5एप्रिल):- तालुक्यातील तलवाडा येथील शिवाजी महाराज चौकातुन ते आंबेडकर चौका कडे जाणा-या दत्त मंदिर ते समाधी स्थळा पर्यंतच्या डांबरी रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती.

आणेक दुचाकी स्वार या ठिकाणी पडल्याची बाब माजी जि.प.सदस्य युवराज डोंगरे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी स्वताह या ठिकाणी उपस्थित राहुन स्वखर्चातुन या रस्ता दुरुस्तीला सुरुवात केली असुन विषेश म्हणजे हा रस्ता बीड जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत येत असल्याने व सध्या स्थितित ह्या रस्त्याला कुठलाही निधी उपलब्ध नसल्याने वाट सरुंची होत असलेली हेडसाळ थांबवन्यासाठी माजी जि.प.सदस्य युवराज डोंगरे डोंगरे यांनी स्वखर्चातुन या रस्ता दुरुस्तीला सुरुवात केली असून सध्या वाहनाची रेलचेल आसल्याने दबाई होताच यावर खडी व डांबरीकरण स्वखर्चातुन करण्यात येईल आसा मनोदय आमच्या प्रतिनिधिशी बोलतांना माजी जि.प.सदस्य युवराज डोंगरे यांनी व्यक्त केला आहे.

या वेळी रस्त्याची पाहणी व दुरुस्ती करुन घेत आसतांना माजी जि.प.सदस्य युवराज डोंगरे, पत्रकार तुळशीराम वाघमारे, खदिर खतीब, बंटी भैय्या भांबरे, शेख मक्सुद, नारायण जाधव, व कामगार बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here