




🔸नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयातील विद्यार्थाना मोफत प्रशिक्षण
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.4एप्रिल):- नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलींसाठी एका विशेष मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या मुलींवर वेळ प्रसंगी कोणतेही वाईट प्रसंग आल्यावर स्वतःच्या जीवाचे रक्षण करता यावे, आणि जमल्यास ती इतरांना सुद्धा वाचवू शकेल, ह्यासाठी महिला तक्रार निवारण समिती, गर्ल्स वेलफेअर कमिटी, चंद्रपूर जिल्हा आष्टेडू मर्दाणी आखाडा आणि कराटे असोसिएशन ब्रम्हपुरी मार्फत 5 दिवशीय मोफत लाठी-काठी व आत्मरक्षणाचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे समारोपीय कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कोकोडे सर., डॉ.शर्मा मॅम (चेअरमन- गर्ल्स वेलफेअर कमिटी), डॉ.मेश्राम मॅम (चेअरमन-तक्रार निवारण समिती ), युवराज मेश्राम सर, उराडे मॅडम, लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष उदयकुमार पगाडे सर, श्री.खानोरकर सर, तसेच कराटे असोसिएशनची संपूर्ण टीम उपस्तिथ होती.. या संपुर्ण पाच दिवशीय शिबिरात मुख्य प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक- इंडिया चीफ एक्झामीनर -सिहान गणेश लांजेवार सर, तसेच सेंसाई सचिन भांडारकर, सेंसाई कृष्णा समरीत, सेंसाई वैष्णवी ठेंगरी, सेंसाई अक्षय कुळे ह्या सर्वांच्या मार्गदर्शनात हा शिबीर घेण्यात आला. सदर शिबिरासाठी महाविध्यालयातील एन.सी.सी. आणि एन.एन.एस च्या संपूर्ण विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता. उपस्तिथ सर्व मुलींना शिबिराचे सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.




