Home महाराष्ट्र स्वा.वि.दा.सावरकर ना.सह. पतसंस्थेला ६८ लाख २६ हजार नफा; ३८ कोटी ११ लाख...

स्वा.वि.दा.सावरकर ना.सह. पतसंस्थेला ६८ लाख २६ हजार नफा; ३८ कोटी ११ लाख कोटी ठेवीचा टप्पा पार !

240

🔹ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी)

परळी(दि.4एप्रिल):-शहरातील अग्रगण्य पतसंस्था स्वा.वि. दा. सावरकर नागरी सहकारी पतंसस्थेने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला आहे.शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्‍वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख कायम ठेवत पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षात ठरवलेले ठेवींचे उद्दीष्ट पुर्ण केले आहे. पतसंस्थेने सरत्या आर्थिक वर्षात ६८ लाख २६ हजार नफा तर ३८ कोटी रूपयांच्या ठेवीचे उद्दीष्ट गाठले आहे.सरत्या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२२ अखेर संस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे.

विशेष म्हणजे अल्पावधीतच पतसंस्थेतील ठेवी ३८ कोटी ११ लक्ष रूपये तर भागभांडवल-६६ लाख , कर्ज २९ कोटी ७९ लाख, गुंतवणूक११ कोटी १८ लाख,निव्वळ नफा ६८ लाख २६ हजार आहे. राखीव निधी २ कोटी ८४ लाख तर आर्थिक उलाढाल ११० कोटी ३० लाख इतकी आहे. खेळते भांडवल ४३ कोटी ९० लाख इतके आहे.सी डी रेशो -६९% इतका आहे.पतसंस्थेच्या या प्रगतीशील वाटचालीत सर्व खातेदार, ठेवीदार, कर्जदार, हितचितक, यांचा विश्‍वास हेच पाठबळ आहे. सर्व कर्मचारी वृंद, नित्यसंचय ठेव प्रतिनीधी यांच्या परिश्रमातून व पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, उपाध्यक्ष अनिल आष्टेकर,सचिव जितेंद्र नव्हाडे ,कोषाध्यक्ष रवि वळसे, संचालक श्रीकांत मांडे,राजाभाऊ मराठे,रंगनाथ सावजी, रवि मुळे,दशरथ होळकर, डॉ.सौ. श्रध्दा देशपांडे, सौ.पद्मश्री धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरु असल्याचे संस्थेचे व्यवस्थापक किरण सावजी यांनी सांगितले.
●●●
*ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी*
दरम्यान पतसंस्था ग्राहक व सभासदांच्या विश्वासावर प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. अनेक ग्राहकोपयोगी योजना व सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत. ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावरच ही वाटचाल आहे. गेल्या अर्थिक वर्षात ३८कोटी ठेवीचे उद्दीष्ट गाठले आहे. या पुढेही वाटचाल सदैव प्रगतीकडे असेल असा विश्‍वास पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केला आहे.

Previous articleसैनिकी शाळेसंदर्भातील स्‍वप्‍नपुर्तीचा विशेष आनंद – आ. सुधीर मुनगंटीवार
Next articleभारतीय स्वातंत्र्य लढ्यात अतुलचंद्र कुमार यांचे योगदान- नातवाने जपल्या आजोबांच्या आठवणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here