Home महाराष्ट्र येडेश्वरी शुगर कारखाना सारणी( आ) च्या आसवानी (डिस्टिलरी) 60KLPD,प्रकल्पाचे ८, एप्रिल रोजी...

येडेश्वरी शुगर कारखाना सारणी( आ) च्या आसवानी (डिस्टिलरी) 60KLPD,प्रकल्पाचे ८, एप्रिल रोजी उद्घघाटन

218

🔹”महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घघाटन

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी)मो:-808942185

केज(दि.4एप्रिल):-शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांतीची मुहुर्त मेढ रोवणाऱ्या येडेश्वरी शुगर कारखाना सारणी( आ) च्या आसवाणी( डिस्टीलरी) विस्तारीत 60kLPD, प्रकल्पाचे उद्घघाटन दि,८, एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी ठिक १०-००, वाजता होणार आहे,

सदरील कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री अजितदादा पवार यांच्या हस्ते, जलसंपदामंत्री मा.ना. श्री. जयंतरावजी पाटिल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ,पालकमंत्री बीड जिल्हा मा.ना. श्री.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या विशेष उपस्थितित होणार असून या कार्यक्रमाला मा.ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, अध्यक्ष आखिल भारतीय वारकरी मंडळ, मा. ह.भ.प. महादेव महाराज बोराडे( शास्त्री) अध्यक्ष श्री, जगदगुरु तुकाराम महाराज पावन धाम संस्थान यांच्या शुभ आशिर्वादाने मा आ. श्री. प्रकाशदादा सोळंके, मा.माजी.आ.श्री. अमरसिंह पंडीत,( प्रदेश सरचिटणिस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य, मा. आ. श्री. बाळासाहेब आजबे( आष्टी विधानसभा मतदारसंघ), मा. आ. श्री. संदिप क्षिरसागर( बीड विधानसभा मतदारसंघ), मा. आ. श्री. संजय दौंड( विधान परिषद सदस्य), मा.माजी. आ. श्री. पृथ्वीराज साठे( केज विधानसभा मतदारसंघ) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे तरी केज तालुक्यातील ,पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांनी ८, एप्रिल, शुक्रवार रोजी, येडेश्वरी साखर कारखाना पवनसुतनगर, आनंदगाव( सा)ता. केज. जि. बिड. येथे उपस्थित रहावे असे आवाहन येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. बजरंग( बप्पा) सोनवणे यांनी केले आहे.

Previous articleभारतीय संविधान : सन्मान, सुरक्षा आणि संवर्धन’ परिसंवादाचे दहिवडी येथे आयोजन;नागरिकांमध्ये संविधानिक नितीमत्ता वाढीस लागावी: डॉ. विनोद पवार
Next articleगुणवत्ता आश्वासन के रूप में ईकॉमर्स पर प्रधान मंत्री का ध्यान भारतीय उद्योग और ईकॉमर्स के लिए वैश्विक प्रतिस्पर्धा लाएगा-साध्वी निरंजन ज्योति (राज्य मंत्री, उपभोक्ता मामले, खाद्य और सार्वजनिक वितरण मंत्रालय और ग्रामीण विकास मंत्रालय)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here