



✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)
मुंबई(दि.4एप्रिल):;मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात मनसेनी भोंग्याच राजकारण करून धार्मिक दंगली भडकवू नये असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.
डॉ. माकणीकर पुढे म्हणाले, मन्सेनि मराठी माणूस सोडून आज हिंदुत्वाचा स्वीकार केला असला तरी जाणीवपूर्वक भोंगा वाद पुढे करत, आरएसएस प्रणित बीजेपी ला खुश करण्यासाठी अडीबाजी करून धार्मिक तेढ निर्मान् करत असतील तर रिपाई डेमोक्रॅटिक पक्ष त्यांच्या या दांभीक प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत आहे.
भारतातील प्रत्येक नागरिकास धर्म स्वतंत्र्याचा अधिकार आहे, अस असताना सुद्धा पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांना जाणीवपूर्वक टार्गेट केल जात् अस असेल तर रिपाई डेमोक्रॅटिक आणी पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा सन्घटनेच्या वतीने समाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांना त्यांचा संविधानिक हक्क बजावण्यासाठी, भोंगा ,मशीद वा मुस्लिम बांधवांना, पोलिसांच्या समवेत मुस्लिम बांधव त्यांचा धार्मिक विधी उरके पर्यंत म्हणजेच नमाज अदा करे पर्यंत सुरक्षा प्रदान केली जाईल असेही विद्रोहि पत्रकार डॉ. माकणीकर यांनी सांगितले.


