



🔹पक्षाने दिलेल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या सेवेसाठीच करणार: बाबासाहेब जाधव
✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308
कुरुल(दि.3एप्रिल):-पंढरपूर येथील कार्यक्रमांमध्ये कुरुल येथील बाबासाहेब जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख , आमदार समाधान आवताडे, आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करुन बाबासाहेब जाधव यांना पत्र देण्यात आले.
त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना बाबासाहेब जाधव म्हणाले की
पक्षश्रेष्ठींचा आदेशाप्रमाणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचुन मला मिळालेल्या पदाचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी व समस्या सोडविण्यासाठी व सरकारच्या विविध शासकीयोजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळवून देत पक्ष वाढीसाठी सतत प्रयत्न करणार असल्याचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बाबासाहेब जाधव यांची निवड झाल्याबद्दल कुरुल पंचक्रोशीत व मोहोळ तालुक्यातुन आनंद व्यक्त केला जात आहे. यावेळी मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनिल चव्हाण, दिनकर मोरे पांडूरंग शुगरचे उपाध्यक्ष कैलास खुळे, भास्कर कासवाडे,लक्षण पापरकर, प्रा,चांगदेव कांबळे,माऊली हाळणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.





