




✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.3एप्रिल):-मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या आदेशानुसार पंचायत समिती चिमूर अंतर्गत श्री गुरुदेव सेवा मंडळ चिमूर येथे प्राथमिक-माध्यमिक शिक्षकांचे एक दिवशीय आयोजन करून गीतमंच गीते व पाठ्यपुस्तकातील कविता गायनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
या कार्यक्रमाचे उदघाटन भाजपा जेष्ठ नेते डॉ. दिलीपराव शिवरकर यांचे हस्ते करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाशबापु बोकारे, रमेश कंचर्लावार, समीर राचलवार, माजी प्राचार्य अतकरे, प्रभाकर पिसे, रमेश भानारकर, लांडे बाबू, पत्रकार रामदास हेमके, कलीम शेख, भरत बंडे, जितेंद्र सहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक वसंत कडू गुरुजी यांचेसह महिला चमू विजया तडस, गीता ठाकरे, ज्योती वाघे, अनिता काळे, रुपमाला गजभिये, बेन्झेवादक प्रकाश वाळके, तबलावादक प्रवीण डुंबरे, घांगरीवादक सचिन वैद्य, झांजवादक परमानंद बोरकर यांनी गीतमंच गीते व पाठ्यपुस्तकातील कविता तालासुरात सादर केल्या.
कार्यक्रमाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी आर्थिक सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन परमानंद बोरकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रभाकर पिसे यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंखेने शिक्षक, नागरिक उपस्थित होते.




