Home महाराष्ट्र उमरी येथील प्रगतशील महिला शेतकरी प्रीती मुकुंदराव ढोबाळे यांचा राज्यमंत्री बच्चू कडू...

उमरी येथील प्रगतशील महिला शेतकरी प्रीती मुकुंदराव ढोबाळे यांचा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते सत्कार

258

✒️कारंजा घाडगे,प्रतिनिधी(पियुष रेवतकर)

कारंजा घा(दि.3एप्रिल):- तालुक्यातील प्रगतशील संत्रा उत्पादक शेतकरी प्रीती मुकुंदराव ढोबाळे यांचा अकोला येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे तालुक्यातील संत्राउत्पादक प्रगतशील महिला शेतकरी म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे महिलांच्या उद्यमशिलतेला चालना देण्यासाठी त्यांनी उत्पादीत केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे.

स्वयंसहायता बचतगटांमधून महिला अत्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करतात, अशा उत्पादनांच्या विक्रीसाठी जिल्ह्यात स्वतंत्र मॉल उभारु, ज्यात केवळ महिलांच्या बचतगटांनी उत्पादीत केलेली उत्पादने विक्री केली जातील, अशी घोषणा ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी अकोला येथे केली. आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यास पालकमंत्री कडू हे प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. विलास भाले होते. जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे, महिला आर्थिक विकास महामंडळ अकोलाच्या समन्वयक वर्षा खोब्रागडे, अधिष्ठाता कृषी डॉ. ययाती तायडे, अधिसभा सदस्य विठ्ठल सरप पाटील, मोरेश्वर वानखडे तसेच अन्य मान्यवर या कार्यक्रमला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here