



✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.3एप्रिल):- मुंबई महानगरातील बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क च्या प्रवेश द्वाराजवळ बौद्ध राजा सम्राट अशोका यांची प्रतिमा बसविण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक वा पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा चे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.
नॅशनल पार्क येथील परिसरात कान्हेरी लेणी असून याच ठिकाणी सम्राट अशोक यांचे पावन पद स्पर्श लागले असून ही भारताची येतिहासिक धरोहर आहे. सम्राट अशोकांनी खुद्द या लेणीवर वास्तव्य केले आहे त्यामुळे हा इतिहासिक ठेवा राखून ठेवण्यासाठी प्रवेश द्वारा जवळ बौद्ध राजा सम्राट अशोका यांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे


