Home महाराष्ट्र परीक्षकांचे मन जिंकून चांगले गुण पदरात पाडता येते – प्रा. दिपा ठाणेकर...

परीक्षकांचे मन जिंकून चांगले गुण पदरात पाडता येते – प्रा. दिपा ठाणेकर यांचे प्रतिपादन

161

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

तुमसर(दि.2एप्रिल):-विद्यार्थ्यांनो, सात एप्रिल रोजी बारावी बोर्डाचा मराठी विषयाचा पेपर आहे. त्यात आपल्याला घवघवीत यश मिळवायचे आहे, त्याकरिता आपल्याला अगदी साधेपणाने आणि संयमाने राहून पेपर सोडविणे आवश्यक आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना ने देशात कहर केला असला तरी, आपण एकमेकाशी ऑनलाइनच्या माध्यमातून जुळलेले आहोत, आणि आपण अध्यापन आणि अध्ययनाचे कार्य प्रभावीपणे केलेले आहोत यात काही शंका नाही.तसेच मराठी विषयाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आपली मराठी भाषा ही महाराष्ट्रात उच्चशिखरावर फडकत असून तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, तेव्हा मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांनी अगदी काटेकोरपणे अभ्यास करून परीक्षकांच्या पोटात शिरून, त्यांच्या मनात घर करून, त्यांचे मन जिंकून घेऊन, भरपूर गुण पदरात पाडून द्यावे.

आणि आपल्या विषयात अव्वल येता येतो . असे मुंबई येथील सुप्रसिद्ध कवीयित्री, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या निमित्ताने तरुण विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक ठरलेल्या, तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या मुंबईचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. दीपा ठाणेकर मॅडम यांनी प्रतिपादन केले.स्थानिक विद्यार्थी अभ्यास मंडळ तुमसर आणि माझी माय सरस्वती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी नव वर्षाचे औचित्य साधून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रा. दीपा ठाणेकर ऑनलाइन बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा. संजय लेनगुरे यांनी बारावी बोर्डाच्या मराठी पेपर मध्ये समाविष्ट असलेले एकूण पाच विभाग त्यात गद्य,पद्य, कथा साहित्यप्रकार, उपयोजित मराठी आणि व्याकरण व निबंध लेखन यांची घटकनिहाय गुणविभागणी स्पष्ट करून दाखविली. तसेच निर्भीडपणे वक्तशीरपणा आणि स्वमताने पेपर सोडवावा असे मत मांडले.

सदर ऑनलाइन मार्गदर्शन सत्रात तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. विद्यानंद भगत, प्रा. तिडके सर साकोली उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु. धनश्री आकरे, रचिता पारधी यांनी तर आभार प्रदर्शन कुणाल बांडेबुचे, शुभांगी कीरपाने यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुलशन गोपाले, वैष्णवी अवथरे, रूची चौरे, मंथन बडवाईक, अमेय भुरे, युगेश बारागौणे, जानवी ठवकर, प्राची पटले,दिलीप सोनवाने, नीलिमा पंधरे, प्रणाली हटवार, सलोनी ठवकर, काजल बुरडे,राजश्री पटले, मानसी माने, धनश्री चित्रिव, गुंजन जवळकर, हिमांशू महांकर , हर्षल शेंडे, सोनाली लाडसे,वैशाली वाघमारे, त्रिवेणी पटले,शुभांगी पटले, शर्वरी गाळवे, दिव्या मेश्राम,आराधना चुधरे, प्रज्वल सेलोकर,प्रज्वल कहालकर, रंजीत नागपुरे इत्यादींनी परिश्रम घेतले.

Previous articleश्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय सिरसाळा राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर आमला येथे संपन्न !
Next articleभारत नाटोचा सदस्य का नाही?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here