




✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.3एप्रिल):-येथील श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष शिबिर दिनांक २६ मार्च २०२२ ते १ एप्रिल २०२२ या कालावधीत मौजे आमला तालुका धारूर येथे घेण्यात आले. या कार्यक्रमाचा समारोप समारंभ दिनांक १ एप्रिल २०२२ रोजी ठीक ११.३० वाजता संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या साठी कार्यक्रमाध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. एच पी.कदम हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. अमन लोहिया संचालक मानवलोक अंबाजोगाई व लालासाहेब आगळे कार्यकारी अधिकारी मानवलोक अंबाजोगाई सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले मान्यवरांच्या स्वागत समारंभानंतर कार्यक्रमाधिकारी डॉ. जयदीप सोळुंके यांनी सात दिवसीय शिबिराचे अहवाल वाचन व प्रास्ताविक केले. याप्रसंगी बोलताना अमोल लोहिया यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही श्रमसंस्कार देणारी संस्था आहे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणारे एक व्यासपीठ आहे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आमला गाव पाणीदार होण्यास मदत झाली.
तसेच यापुढेही आमला गाव समृद्ध ग्राम ठरेल आणि यात राष्ट्रीय सेवा योजनेचा सहभाग असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .मा. लालासाहेब आगळे यांनी एन .एस .एस.चे स्वयंसेवक हे ग्राम दूत आहेत.त्यांच्या माध्यमातून खेडी स्वयंपूर्ण व समृद्ध होत आहेत आणि यापुढेही आमला गाव ग्रामसमृद्धी योजनेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होईल. असा विश्वास व्यक्त केला अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. एच.पी कदम यांनी केला या शिबिराच्या माध्यमातून सात दिवसात स्वयंसेवक ग्रामस्थ व पाणी फाउंडेशन च्या दूतांनी संपूर्ण गाव स्वच्छ केला., नालेसफाई ,वृक्षांना आळी करणे तसेच संपूर्ण गावात आरोग्य साक्षरता विषयक सर्वेक्षण करणे, शिवारफेरी च्या माध्यमातून गावातील जलसंधारण कार्याची ओळख करून घेतली .या शिबिरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गोविंद पोळ व प्रतीक्षा चव्हाण यांना पाणी फाउंडेशन च्या वतीने उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सन्मानित करण्यात आले . याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ.जयदीप सोळुंके प्रा. डी व्ही झिंजुर्डे ,प्रा.अरुण वाळके प्रा. उषा माने यांना विशेष सत्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून डॉ.एम.बी.धोंडगे अधिसभा सदस्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद सहयोगी प्राध्यापक डॉ. जि.व्ही.गट्टी ,सरपंच नागनाथ पापा सोळंके माजी सरपंच एकनाथ चिलवंत व्यासपीठावर उपस्थित होते सर्व ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात व आतिषबाजी करून प्रमुख अतिथी मा.आमन लोहिया ,लालासाहेब आगळे व प्राचार्य डॉ.एच.पी. कदम व स्वयंसेवकांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ नाना सोळंके यांनी केले तर आभार प्रा.ए.बी. वाळके यांनी मानले तर स्वागत गीत प्रा. डी व्ही झिंजुर्डे यांनी गायले.या कार्यक्रमास स्वयंसेवक, ग्रामस्थ, महिला मंडळी, व तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते




