Home महाराष्ट्र चिमूर तालुक्यातील सावरी (बिड) ग्रामपंचायत यांनी अपंगाना ५ टक्के निधी वितरित –...

चिमूर तालुक्यातील सावरी (बिड) ग्रामपंचायत यांनी अपंगाना ५ टक्के निधी वितरित – प्रहार सेवक विनोद उमरे यांच्या प्रयत्नाला यश

129

🔸उपसरपंच शेषराव ढेपाले यांच्या उपस्थितीत अपंग कल्याण ५% निधी वितरित

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.2एप्रिल):-अपंग बांधवांना ५ टक्के निधि वितरित करण्यात यावे यासाठी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय चिमूर यांना निवेदन सादर केले होते की अपंग बांधवांना ५% निधी त्वरित वितरित करण्यात यावे अन्यथा पंचायत समिती कार्यालयांवर चळून विरुगिरिने आंदोलन करुन जर पंचायत समिती स्तरावरुन आदेश देऊन ग्रामपंचायत सचिव यांनी जर अपंगांना ५%निधी जर वितरित केले नाही तर ग्रा.पं.सचिव यांच्या खुर्ची टेबल जाळण्यात येईल असा इशारा देताच ग्रामपंचायत सावरी (बिड) यांनी अपंगांना ५% निधी वितरित करण्यात आले अपंग निधी चे चेक च्या स्वरुपात वाटत केल्याने अपंग बांधवांनी उपसरपंच शेषराव भाऊ ढेपाले यांचे आभार मानले सहा अपंग बांधवांना प्रति २५०० रुपये देण्यात आले.

स्थानिक ग्रामपंचायतला येणाऱ्या उत्पन्नातून दिव्यांगाना पाच टक्के अर्थसाहाय्य करणे याबाबत शासनाचा आदेश असताना अनेक स्थानिक ग्रामपंचायतीने दिव्यागांना निधी खर्च केले प्रहार संघटनेच्या प्रयत्नामुळे येथील सहा दिव्यांगाना सावरी (बिड) ग्रामपंचायतने यांनी अर्थसहाय्य केले आहे.

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून ग्रामीण भागातील दिव्यांगांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी प्रयत्न केले. यावर शासनाचे निर्णय घेऊन स्थानिक ग्रामपंचायतीच्या येणाऱ्या उत्पनावरुन दिव्यागांना पाच टक्के आर्थिक मदत करावी असा आदेश काढला. मात्र अनेक ग्रामपंचायतींनी या आदेशाकडे कानाडोळा केला मात्र, स्थानिक प्रहार संघटनेचे प्रहार सेवक विनोद उमरे यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेतली ग्रामपंचायत सावरी (बिड) मधिल ६ दिव्यांगना २५०० रुपये प्रमाणे धनादेश देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here