Home महाराष्ट्र आमदार नव्हे तर कामदार बनून काम करण्याचा माझा संकल्प — आमदार देवेंद्र...

आमदार नव्हे तर कामदार बनून काम करण्याचा माझा संकल्प — आमदार देवेंद्र भुयार

318

🔹आमदार देवेंद्र भुयार यांनी उभारली मतदार मतदार संघाच्या विकासाची गुढी 

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.2एप्रिल):-महाराष्ट्रभर गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोरोनानंतर पहिल्यांदा निर्बंध शिथिल झाल्याने लोकांमध्ये गुढीपाडवा साजरा करण्याचा उत्साह आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी येथे गुढीपाडवा निमित्त मोर्शी विधानसभा मतदार संघाच्या विकासाचा संकल्प घेऊन मतदार संघाच्या विकासाची गुढी उभारून गुढीपाडवा निमित्त मोर्शी वरूड तालुक्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आरोग्य जपण्याचा मंत्र त्यांनी दिला.मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाकरीता आपण विकासकामांवर भर दिला असून मतदार संघाचा विकास हाच माझा ध्यास असून आमदार नव्हे तर कामदार बनून काम करून मतदारसंघाचा कायापालट करणे हीच आपली विकासपूर्तीची संकल्पना असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.

मोर्शी विधानसभा मतदारसंघातील गाव असो, वाडी वस्ती असो त्या ठिकाणी विकासकामे झाली पाहिजे यासाठी आपण नियोजन केले आहे.अडीच वर्षाच्या काळामध्ये मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलू लागला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा दुपटीने कामे करण्यात येऊन मतदार संघाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही शिवाय आमदार नव्हे तर कामदार बनून काम करण्याचा माझा संकल्प असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.

येवेळी कार्यक्रमाला आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, उमेश गुडधे, मोहन मडघे, डॉ प्रदीप कुऱ्हाडे, माजी जी प सदस्य बंडू साऊथ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष हितेश साबळे, युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, घनश्याम कळंबे, शेर खान नन्हे खान, रोशन दारोकर, विपुल हिवसे, पंकज हरणे, हितेश उंदरे, शुभम तिडके, गजानन वानखडे, वैभव फुके, मयूर राऊत, राजेश टाक, विवेक शहाणे यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here