



✒️फलटण(पुरोगामी न्युज नेटवर्क)
फलटण(दि.२मार्च):- श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर शाखा न्यू इंग्लिश स्कूल निंबळक तालुका फलटण जिल्हा सातारा येथील उपक्रमशील शिक्षक व माजी प्रा. मुख्याध्यापक श्री अवधूत कोळी (सर) यांना नॅशनल युथ अवर्डिज फेडरेशन ऑफ इंडिया व विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मा. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड , केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा रेखा शर्मा, केंद्रीय मानवाधिकार आयोग सदस्य ज्ञानेश्वर मुळे, राष्ट्रीय सफाई कामगार आयोग अध्यक्षा अंजना पवार, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग अध्यक्ष प्रियांक कनुगो यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यासाठी संस्थेचे सहसचिव डॉ. श्री आर. व्ही. शेजवळ तसेच साहित्यिक ताराचंद आवळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल त्यांचे अधिनंदन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री अभयकुमारजी साळुंखे, संस्थेचे सचिव सौ. शुभांगी ताई गावडे, संस्था मुख्यकार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे, श्री संस्था सहसचिव अर्थविभाग श्री एस. एम गवळी, मा. मुख्याध्यापक श्री एस. बी. कदम, प्रा. गोरख साठे व संस्थेचे पदाधिकारी व गुरुदेव कार्यकर्ते यांना अभिनंदन केले.


