



✒️प्रतिनिधी खर्डी(अमोल कुलकर्णी)मो:-9922767696
पंढरपूर(दि.2एप्रिल):-तालुक्यातील खर्डी येथे शंभू महादेवाच्या कावडी हर हर महादेवच्या गजरात मिरवण्यात आल्या. फरारा, बांबू, दोन नंदी, दोन मोठे पाण्याचे कलश घागरी, घुंगरु, चंगाळ्याचा पट्टा,शिवजटा,अशा साज शृंगारात कावड सजवण्यात आल्या होत्या.मिरवणूकी नंतर गावाबाहेरील कावडीबुवा येथे धार वाहिली जाते. नंतर दारात उभ्या केल्या जातात. नंतर रामनवमीला शिखर शिंगणापूर कडे प्रस्थान केले जाते .
ही मानाची परंपरा गेली वर्षानुवर्षे चालू आहे. या परंपरेत सर्व जातीय कोळी, दलित, मराठा, वाणी, कोष्टी,आदि समाजाच्या कावडी शिखर शिंगणापूर येथे नेण्यात येतात.
दोन दिवस सर्व खर्डीच्या कावडींसाठी तिथे दहा गुंठे जागा राखीव ठेवली जाते. चैत्र एकादशीला सर्व लिंगांना पहाटे धार वाहून नंतर कावडी मूळ ठिकाणी येतात.तिथून परतीचा प्रवास सुरु होतो.या कावडी नेण्यात मारुती कोरे,शिवा रोंगे, शामराव रोंगे,नाना राजमाने,गणपत रोंगे,राजू चंदनशिवे,दत्ता यादव ,मारुती शिरसट,संतोष पाटील,हणमंत कोळी यांच्या मानाच्या कावडी असतात.
———–
माझे 76 वय आहे .मला जसे कळतेय तसे आमच्या घरातून कावड नेली जाते.कावडी सजवणे हे काम मी करतो.पूर्वी चालत जात होतो.तीन दिवस लागायचे आणि येतानाही चालत होतो.आता वाहनातून नेण्यात येतात.-भिकाजी रोंगे


