Home महाराष्ट्र काँग्रेसचे “महागाई मुक्त भारत” आंदोलन संपन्न

काँग्रेसचे “महागाई मुक्त भारत” आंदोलन संपन्न

145

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.1एप्रिल):-पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेची लुट करत आहे.5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी परभवाच्या चिंतेने पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅंस सिलेंडरच्या किमती सरकारने रोखुन धरल्या होत्या.परंतु निवडणुका संपताच पुन्हा दरवाढ करून जनतेस लुटण्यास सुरूवात केली आहे. मागिल 8 दिवसात पेट्रोल, डिझेल मध्ये दररोज 80 पैशाने वाढवत 7 रूपयाची वाढ केली तर एलपीजी गॅंस सिलेंडर 50 रूपयाने महाग केला असुन तो आता काही ठिकाणी 1 हजार रूपयाच्या वर गेला आहे.

यासोबतच PNG आणी CNG गॅंसही महाग केला आहे. तसेच खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तुंच्या दरातही मोठया प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जगने मुश्किल झाले आहे.तसेच इंधन दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सर्वसामान्य जनतेची खुलेआम लुट सुरू आहे. पण केंद्रातील  सरकार मात्र डोळेझाकुन बसले आहे.

जनतेला लुटणा-या सर्वसामन्यांच्या मेहनतीच्या कमाईवर डाका टाकणा-या केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात आवाज उठवुन केंद्र सरकारला जागे करण्यासाठी अखिल भारतीय काॅगे्रस कमिटीच्या अध्यक्षा मा.सोनियाजी गांधी यांनी ‘महागाई मुक्त भारत’ अभियाना अंतर्गत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याअनुषंगाने मा. प्रांताध्यक्ष नानाभाउ पटोले यांच्या आदेशानुसार व यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष मा.आ वाजाहत मिर्झा यांच्या सुचनेनुसार, आज दिनांक 01 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता पासून गांधी पुतळ्या समोर “महागाई मुक्त भारत आंदोलन” केले असून या प्रसंगी काँग्रेसचे माजी आमदार विजयराव खडसे, प्रदेश महासचिव तातूजी देशमुख, शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे, राम देवसरकर (मा जि प बा सभापती), जिल्हा सरचिटणीस गोपाल अग्रवाल, कृष्णा देवसरकर, युवराज देवसरकर (युवक विधानसभा अध्यक्ष), बाळूभाऊ मुडे (शहर अध्यक्ष व्ही जे एन टी सेल), सोनू खतीब (अमरावती अल्पसंख्याक विभाग), कुमार केंद्रेकर,दुर्गमवार अण्णा, सुलेमान गुरू, लाहेवार, ईश्वर गोस्वामी, सुनील चेके (शहराध्यक्ष ओ.बी.सी सेल), भैया पवार, किशोर तिवारी, सचिन गाडगे, विक्की धमोने, राहुल वानखेडे, गणेश रावते, बंटी मंत्री, विरेंद्र खंदारे, बंटी देशपांडे, कुणाल श्रवले, दर्शन भंडारी, मयूर उदावंत, साईनाथ जाधव, गजानन भारती, नवल कलोसे, रियास खान, इर्शाद सर, जम्मूभाई पेंटर, तावकिर शेख,इरफान पटेल, शे अशुभाई, सुशील ठाकूर, प्रकाश वानखेडे असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते जनता उपस्थित होते.

Previous articleग्राम पंचायत सदस्‍यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्‍यास एक वर्षाची मुदतवाढ द्यावी : आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
Next articleकेंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं गंगाखेड शहरात जंगी स्वागत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here