



✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)
परळी(दि.2एप्रिल):-जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या आठव्या वर्धापणदिना निमित्त आयोजीत केलेल्या पुरस्कार वितरण व सत्कार सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दिपक कूमार खोब्रागडे यांनी देशातील आणि राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे – केंद्रीय उपाध्यक्ष- प्रा. दशरथ वैजनाथ रोडे म्हणून संस्थेच्यापदावर गेले दोन वर्षापासून काम करत आहेत. तसेच प्रा. रोडे महाराष्ट्रातल्या सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार, संपादक, संपादकीय, अग्रलेख, स्तंभ-लेखन, आणि राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे परळी शहर प्रतिनिधी पदापासून प्रवास कार्य करत तालुकाध्यक्ष एक वर्ष परळी कार्यकारिणी तयार करून संघाला सदस्यांच्या जोडणी , संघाची जबाबदारी पून्हा बीड जिल्हाध्यक्ष पदावर तीन वर काम करत राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाली. संपूर्ण राज्यात संघाचे सभासद नोंदणी करण्यासाठी अहोरात्र मेहनत परिश्रम घेतले .आज राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष या. विजय सुर्यवंशी यांनी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रा. दशरथ रोडे यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यात संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वाखाली असंख्य सभासद प्रतिनिधींची नोंदणी सुद्धा करण्यात आली आहे.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्यावतीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दिपक कूमार खोब्रागडे सरांनी यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारांनी प्रा. दशरथ रोडे यांची निवड करून २७ मार्च २०२२ रविवार रोजी, नागपूर येथील. दीक्षा भूमीच्या ऑडिटरियम सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
प्रा. डॉ. दिपक कूमार खोब्रागडे म्हणाले की, देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले.याप्रसंगी प्रा.दशरथ रोडे यांच्या महाराष्ट्रातल्या सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार, संपादक, संपादकीय, अग्रलेख, स्तंभ-लेखन तसेच जन सन्मान या वृत्तपत्राच्या माध्यमातून लिखाण व संपादकीय अग्रलेख, वाचनिय आणि प्रेरणादायी तसेच समाज उपयोगी होय याकरिता जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
त्याचप्रमाणे हा ऊर्जादायी क्षण होता. स्थळही महत्वाचे होते. डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या आयुष्यात सकल परिवर्तनाचे बीज रोवले ,त्या उर्जादायी व क्रांतीभूमी दीक्षाभूमीच्या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला . पाहुणेही तितकेच महत्वाचे होते. राजकीय लोक कुठेही भेटतात. त्यांच्या हातून पुरस्कारही मिळतात पण जागतिक किर्तीचे भंते,दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष आर्यनागार्जून सुरई ससाई आणि मेंदूरोग तज्ञ डाँ. चंद्रशेखर मेश्रामसाहेब यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारणे म्हणजे आयुष्यातील एक ठळक बाब होय . यास्तव इतरही मान्यवर पाहुणे महत्वाचेच होते . माझ्या दृष्टीने या बाबी अधिक महत्वाच्या होत्या . जेवनाबद्दल काहिंच्या कुरबुरी ऐकायला येत होत्या . पण मला तो मुद्दा गौण वाटतो . आपण आणि आपल्या सर्व सहका-यांनी खुप छान आयोजन केले . दुर्लक्षीत आंबेडकरी साहित्तिकांचा व विविध क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार ही ठळक बाब आहे .
कारण आंबेडकरी साहित्य हे परिवर्तनाचं, प्रेरणादायी सामाजीक जाणीवेतून लिहिलेलं, समाजातील शोषीत, वंचीत पिडीत लोकांच्या वास्तव जीवनाला अधोरेखीत करणारं उर्जादायी साहित्य आहे . अनेक संस्थांना व इतर निव्वळ सौंदर्यवादी आणि रंजनवादी साहित्तिकांना आंबेडकरी साहित्य रुचत नाही. म्हणून कधी कधी ते त्यांना गौरवापासून दूर ठेवत असल्याचे जाणवते . पण आपण अशा साहित्याचा व साहित्तिकांचा मोठ्या स्तरावर गौरव केला . निश्चितच साहित्तिकांची यामुळे जबाबदारी वाढली आहे .ही जाणही असली पाहिजे .म्हणूनही ही बाब नोंद घेण्यायोग्य आहे . आपले कार्य भविष्यातही असेच सुरू राहावे. जागतिक स्तरावरही निळा ध्वज फडकत राहणा आहे. राहावा ,त्यासाठी आपल्या धाडसाचे कौतुकच आहे, आपले हार्दिक अभिनंदन आणि मंगलकामना . तसेच आपल्या सर्व सहका-यांचेही मनस्वी धन्यवाद !


