Home महाराष्ट्र शोषित मुक्तीच्या लढाया : भ्रम आणि वास्तव पुस्तकाचे प्रकाशन

शोषित मुक्तीच्या लढाया : भ्रम आणि वास्तव पुस्तकाचे प्रकाशन

273

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

उमरेड(दि.2एप्रिल):-उमरेड येथे विदर्भस्तरीय बामसेफ युनिट तर्फे बहुजननायक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त कॅडर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक डॉ. सुरेश माने संस्थापक- अध्यक्ष बीआरएसपी हे होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक संदीप गायकवाड हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.मगर सर मा.दुपारे सर व मंडपे मॅडम उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात बहुजनांचे प्रेरणास्तोत्र महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज व बहुजननायक कांशीराम यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन करण्यात आले.संदीप गायकवाड लिखित “शोषित मुक्तीच्या लढाया: भ्रम आणि वास्तव” व डॉ.सुरेश माने यांच्या “कांशीराम :द इनहेरिटर्न ऑफ डॉ.आंबेडकर लेग्नशी” या पुस्तकाचे विमोचन डॉ. सुरेश माने यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. सुरेश माने आपल्या मार्गदर्शन म्हणाले की ,सामाजिक परिवर्तनाची लढाई लढणे हे बामसेफची ध्येय आहे. आपल्यामधील कार्यकर्त्याची जाणीव अंगीकार करून नव्या रणनितीचा उपयोग करून आपण आपले आंदोलन चालवले पाहिजे .बदलत्या काळाच्या अनुषंगाने स्वतःमध्ये बदल करून आपले संघटन मजबूत केले पाहिजे. तर कार्यक्रमाचे उद्घाटक संदीप गायकवाड म्हणाले की, काळवंडलेल्या गंभीर वातावरणात स्वतःमधील आंबेडकरी बाणा मरु देऊ नये. राजकीय अपरिपक्वता नष्ट करून राजकीय परिपक्वता व सामाजिक परिपक्वता निर्माण करणे हे बामसेफचे व्हिजन असावे. समाजाचा नवा आयाम निर्माण करणे ही ताकद फक्त तरुण बामसेफ कार्यकर्त्यांमध्येच आहे .तसेच मगर सर, दुपारे सर,मंडपे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाचे संचालन रंगारी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन चंदन नगराळे यांनी मानले. कार्यक्रमाची सर्व जबाबदारी इंजिनीयर धनपल मंडपे व त्यांचे सहकारी त्यांनी चोखपणे पार पाडली .या कार्यक्रमाला विदर्भातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here