Home महाराष्ट्र प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर जिल्ह्याच्या वतीने ३०० जनावरांना चारा...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर जिल्ह्याच्या वतीने ३०० जनावरांना चारा वाटप

69

🔸जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते आयोजन

✒️लातूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

लातूर(दि.2एप्रिल):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातुर जिल्हा शाखा विविध कार्यक्रम राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष व फोटो क्राईमचे पत्रकार महादेव पोलदासे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री गणेश जिवराज जैन गोरक्षण लातूर येथे ३०० मुक्या जनावरांना चारा खाऊ घालण्यात आला.

याप्रसंगी गोरक्षणचे कार्याध्यक्ष शरद गुंडलवाल यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमास प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहूकुमार शिंदे, जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, पत्रकार नितीन हांडे, धनंजय मुंडे, किशोर जाधव, प्रवीण पवार, राजू कासार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here