



🔹प्रफुल क्षीरसागर यांच्या आंदोलनाने सुस्त प्रशासन झाले जागे
🔸प्रफुल क्षीरसागर यांच्या नेतृत्वात सुरू होता रस्त्यासाठी प्रहारचा संघर्ष
✒️आर्वी प्रतिनिधी(पियुष रेवतकर)
आर्वी(दि.1एप्रिल):- गेल्या तीन ते चार वर्षापासून अपूर्ण असलेल्या आर्वी ते तळेगाव रस्त्याला सुगीचे दिवस येताना दिसत आहे. संभाजी ब्रिगेड चे नेते प्रफुल क्षीरसागर यांनी वेळोवेळी केलेले आक्रमक आंदोलन वरिष्ठांशी घेतलेल्या बैठकांमुळे आता नव्याने आर्वी ते तळेगाव महामार्गाचे निविदा काढण्यात आल्या असून नवीन कॉन्ट्रॅक्टर मार्फत हे काम पूर्ण होणार आहे. या बद्दलची माहिती मा. बोरकर साहेब कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग) यांनी दिली.
या रस्त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन कुंभकर्णी झोपेत असताना व जनसामान्य नागरिकांची गैरसोय लक्षात घेता आर्वी ते तळेगाव रस्त्याचा एकाकी लढा प्रफुल क्षीरसागर यांनी उभारला होता. या रस्त्यासाठी एक ना अनेक आंदोलने प्रफुल क्षीरसागर यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेडने केली.
त्याच सोबत प्रशासनाशी बैठका, बांधकाम विभागाशी बैठका, खासदार तडस यांच्यासह अधिकाऱ्यांसोबत बैठक असे एक ना अनेक प्रकारे हा प्रश्न लावून धरला ज्याचं फलित आज येताना दिसत आहे. प्रफुल क्षीरसागर यांनी या रस्त्यासाठी उभारलेल्या लढ्याबद्दल व या लढ्याला येत असलेल्या यशामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.माझा कार्यकर्ता जो प्रत्येक वेळी हाकेला ओ देऊन जनतेसाठी तयार असतो अशा जिवाभावाच्या कार्यकर्त्यांमुळे आम्ही हा लढा लढू शकलो व यशस्वी झालो अशी प्रतिक्रिया प्रफुल क्षीरसागर यांनी दिली.





