



✒️भास्कर फरकडे(चामोर्शी प्रतिनिधी)
चामोर्शी(दि.1एप्रिल):-“मोदीजींच्या विकासाचा जन्मदिवस म्हणजेच एप्रिल फुल दिवस म्हणत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने १ एप्रिल २०२२ रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात मोदींच्या विकासाचा जन्मदिवस महागाईकडे लक्ष वेधण्यासाठी साजरा करण्यात आला.
आष्टी येथील पेट्रोल पंपावर वाढती महागाई, बेरोजगारी, खोटे जुमले या मोदींच्या आश्वासनांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ,नेमाजी घोगरे राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष, राहुल डांगे राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष आष्टी, बंटी गेडाम आष्टी शहर अध्यक्ष, अंकुश खामंकर, उपेष इजमांकर युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.


