



✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)
बीड(दि.31मार्च):- जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मौजे गुळज याठिकाणी सालाबादाप्रमाणे याही वर्षी विश्वभुषन बोधिसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सामाजिक बांधिलकी जपत महामानवाच्या जयंतीची समिती स्थापन करण्यात आली.
यावेळी संयोजन समितीच्या अध्यक्षपदी गावचे भुमिपुत्र विशाल वाकडे, उपाध्यक्षपदी शिराज मिर्झा, सचिवपदी रमेश निकाळजे तर खजिनदारपदी कैलास निकाळजे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावाने गेल्या दोन वर्षी जयंती उत्सव साजरा केला गेला नाही परंतू यावर्षी महामानवाचा जयंती उत्सव सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्याचे आयोजन गुळज येथे करण्यात आले आहे. सामाजिक बाधिलकी जपतच महामानवाची जयंती साजरी केली गेली पाहिजे असे अमोल वाकडे यांनी यावेळी सांगितले.


