Home महाराष्ट्र इम्रान खान क्लिन बोल्ड!

इम्रान खान क्लिन बोल्ड!

117

✒️प्रा डॉ सुधीर अग्रवाल(९५६१५९४३०५)

आपल्या गुगलीवर चांगल्या चांगल्या फलंदाजांना बोल्ड करणारा इम्रान खान स्वतःच मात्र राजकारणाच्या पिचवर बोल्ड झाला आहे.विरोधी पक्षांनी इम्रान खान विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा सत्तेवरुन पायउतार होणार असल्याचे स्पष्ट चिन्हे दिसत आहे. त्यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाला जोरदार झटका बसलाय. पीटीआयचा मित्रपक्ष कौमी मूव्हमेंट पाकिस्तान (MQMP) ने पीटीआयला पाठींबा न देण्याचा विचार केलाय. एमक्यूएमने विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान पीपुल्स पार्टी (PPP) सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे आता इमरान खान यांच्या हातची सत्ता जाणार निश्चित आहे. फक्त औपचारिक घोषणेची प्रतिक्षा असल्याचे बोलले जात आहे.

हा नवा पाकिस्तान आहे,अशी वलग्ना करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे पंतप्रधान पद धोक्यात आले आहे. एकीकडे विरोधकांनी इम्रान खान यांच्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणून अडचणी निर्माण केल्या आहेत.

‘काहीही झाले तरी राजीनामा देणार नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत खेळत राहणार आणि विरोधी पक्षालाच धक्का देणार’, अशी ठाम भूमिका घेणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे बॅकफूटवर जातील अशी दाट शक्यता आता निर्माण झाली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारविरुद्ध विरोधी पक्षनेते आणि पीएमएल-एनचे अध्यक्ष शहबाझ शरीफ यांनी सोमवारी नॅशनल असेम्ब्लीत अविश्वास ठराव मांडला होता . १६१ सदस्यांनी ठरावाला अनुकूलता दर्शवली. यानंतर, अविश्वास ठराव मांडण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे सभागृहाचे उपाध्यक्ष कासीम खान सुरी यांनी सांगितले. यापाठोपाठ शरीफ यांनी अविश्वास ठराव मांडल्यानंतर तो ता पारित झाला असून इम्रान खान सरकार अल्पमतात आल्याने आता ते केव्हाही राजीनामा देऊ शकतात.

इम्रान खान हे पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील असे संकेत मिळू लागले आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाच्या यूट्युब चॅनेलचे नाव अचानक बदलण्यात आले. पंतप्रधान कार्यालय या ऐवजी आता इम्रान खान असे नाव या यूट्युब चॅनेलला दिले गेले आहे. या बदलामुळे इम्रान यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, विरोधी पक्षांनी इम्रान यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. इम्रान यांच्याविरुद्ध नॅशनल असेंब्लीत अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे इम्रान यांच्या पक्षातील अनेक खासदारांचे या प्रस्तावाला समर्थन असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. अशावेळी इम्रान खान स्वतः राजीनामा देतील की नॅशनल असेंम्बली राजीनामा घेतील हे लवकरच स्पष्ट होणार आहे.पाकिस्तानच्या राजकीय इतिहासात असं पाहिल्यांदाचं घडलं आहे की सत्तारूढ पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आलेली आहेत…

एमक्यूएमने पीटीआयसोबतचा पाठिंबा काढल्यानंतर पीपीपी अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी एक ट्विट केले आहे. भुट्टो यांनी ट्विट करत म्हटले, “विरोधी पक्ष आणि एमक्यूएम यांच्यात एक करार झाला आहे. याविषयी आम्ही तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांद्वारे माहिती देऊ. ” त्यांनी पाकिस्तानला शुभेच्छा दिल्यात.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीत एकूण ३४२ सदस्य संख्या आहे. बहुमतासाठी इथे १७२ सदस्यांची आवश्यकता असते. मात्र एमक्यूएमने पाठिंबा काढल्यावर पीटीआय सरकारकडे केवळ १६४ सदस्य संख्या राहली तर विरोधी पक्षाकडे १७७ सदस्य संख्या झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here