Home चंद्रपूर चंद्रपुरात आशा दिवस उत्साहात साजरा

चंद्रपुरात आशा दिवस उत्साहात साजरा

120

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.31मार्च):- तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने दि. 26 व 27 मार्च रोजी आशा दिवस जिल्हा परिषदेतील कर्मवीर कन्नमवार सभागृहात साजरा करण्यात आला. दोन दिवसीय आयोजित या कार्यक्रमात विविध मनोरंजनाचे व आरोग्य विषयक कार्यक्रम पार पडले.

या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शृंगारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित जैस्वाल, डॉ. आशिष वाकडे, डॉ. प्रशांत चौधरी, डॉ. विवेक बांगडे जिल्हा समूह संघटक शीतल राजापुरे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक दोसना बागेसर तसेच तालुक्यातील आशा स्वयंसेविका आशा गटप्रवर्तक प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, कोविड-19 च्या संक्रमण काळात आशा स्वयंसेविकानी मोलाची भूमिका पार पाडली आहे. कोविड-19 काळात आशा स्वयंसेविकांनी वाघीनी प्रमाणे कार्य केले आहे. व पुढेही करीत राहणार आहेत, या शब्दात त्यांचे कौतुक केले. तसेच यापुढे आशा स्वयंसेविका च्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू. असे आश्वासन आमदार जोरगेवार यांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमात गीत गायन, नृत्य, पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, पाककला असे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी वर्षभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक तसेच ज्या गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी ई- संजीवनी बाबत गावामध्ये जनजागृती करीत ओपीडीबाबत सेवा दिली, त्यांचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यासोबतच राष्ट्रीय लसीकरण दिवसानिमित्त पल्स पोलिओ लसीकरण अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविकाना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहिदास राठोड,मुरलीधर ननावरे,जयांजली मेश्राम,सदीप मून तसेच कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाला आरोग्य सेविका, स्टाफ नर्स व तालुका आरोग्य कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here