Home गडचिरोली जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन

जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन

83

🔹केंद्रातील भाजप सरकार विरोधात घोषणा करून केले सरकारचा निषेध

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.31मार्च):-२०१४ पासून अच्छे दिन चे गाजर दाखूवून केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकार सत्तेत आली. तेव्हा पासून आज पर्यंत केंद्रातील भाजप सरकारने आपल्या धोरणामुळे समान्य गोरगरीब जनतेचे जगणे कठीण करून ठेवले आहे. कधी नोटबंधी, कधी पेट्रोल, डीझेल तर कधी गॅस, खाण्याचे तेल या सारख्या अनेक जीवनावश्यक वस्तूच्या किंमतीत वाढ. वाढती बेरोजगारी करून गोरगरीब जनतेला छळण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले.

त्यामुळे सामान्य जनेतला व युवकांना न्याय मिळवून देण्याकरिता जिल्हा युवक कॉंग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष लॉरेन्स गेडाम यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरातील पेट्रोल पंप वरती मोदी सरकार च्या विरोधात घोषणा करून त्यांचा विरोध करण्यात आला.

यावेळी जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे, माजी आमदार आनंदराव गेडाम, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेवराव कीरसान, शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवा नेते अतुल मल्लेलवार, आरमोरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अक्षय भोवते, प्रतिक बारसिंगे, युवक काँग्रेस ता.अध्यक्ष घनश्याम मुरवतकर, विश्वनाथ भोवते, राकेश रत्नावार, दिलीप घोडाम, शकीब खान, हरबाजी मोरे, सुभाष धाईत, हरबाजी मोरे, वसंत राउत, कृष्णाची झंजाळ, निखील खोब्रागडे, निलेश अंबादे, गोलू वाघरे, प्रमोद गौतम, उत्सवआंबटवार, वेदांत कापकर, अमान भोवते, शहजाद शेख, विलास वासनिक, गौरव येण्प्रेडीवार, विपुल येलेटीवार, कुणाल ताजने, मयुर गावतुरे सह अनेक आंदोलनकर्ते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here