Home महाराष्ट्र पॉवर ऑफ मीडिया नांदगांव खंडेश्वर तालुका कार्यकारिणी गठित

पॉवर ऑफ मीडिया नांदगांव खंडेश्वर तालुका कार्यकारिणी गठित

82

🔸तालुका अध्यक्ष प्रशांत झोपाट, कार्याध्यक्ष प्रदीप रघुते, सचिवपदी उमेश चव्हाण यांची नियुक्ती

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.31मार्च):-पॉवर ऑफ मिडीया या राज्यव्यापी पत्रकार संघटनेची नांदगांव खंडेश्वर येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच बैठक पार पडली या बैठकीत नांदगांव खंडेश्वर तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यावेळी विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून अथहर खान, निकेत ठाकरे, प्रशांत झोपाटे हे उपस्थित होते. या बैठकीत तालुका अध्यक्ष म्हणुन सर्वानुमते प्रशांत झोपाटे , कार्याध्यक्ष प्रदीप रघुते तर तालुका सचिवपदी उमेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली.

तसेच उर्वरित कार्यकारिणी चे गठण सर्वानुमते करण्यात आले. त्यामध्ये उपाध्यक्षपदी गजानन भस्मे, सागर गावनेर, मनोज जैन संदेश ढोके, सहसचिव योगेश राऊत, कोशाध्यक्ष पवन ठाकरे, संघटक श्रीपाल सहारे, प्रसिद्धी प्रमुख रमेश गंजीवाले, मार्गदर्शक शिवदास उईके, वकील दानिश, विनेश बेलसरे, अवधूत गाडेकर, गजानन झोपाटे, तर सदस्यपदी निकेत ठाकरे,अथहर खान, अनिकेत शिरभाते, सागर सव्वालाखे, अंकुश निमनेकर, नितेश कानबाले, प्रमोद देशमुख, गोकुल खोडके, विजय नाडे, सूरज सहारे, संजय पवार, देवीदास गाडेकर, गणेश माटोडे, श्रीकृष्ण शिरबह्हादूरकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सर्वत्र नवनियुक्त कार्यकारिणी च्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous articleविनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांना कैद व शिक्षा
Next articleसातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग(प्राथमिक) जिल्हास्तरीय क्रीडाशिक्षक प्रशिक्षण शिबीर संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here