Home महाराष्ट्र विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांना कैद व शिक्षा

विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांना कैद व शिक्षा

248

✒️नितीन राजे(खटाव प्रतिनिधी)

खटाव(दि.31मार्च):-वर्धनगड जिल्हा सातारा तालुका खटाव घाटाच्या हद्दीत विनापरवाना वाळूची वाहतूक करताना अडवल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी व मारहाण करून त्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्या दोघांना कोर्ट उठेपर्यंत साधी कैद आणि प्रत्येकी २० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

तानाजी वलेकर व सचिन राजगे (रा. पिंपरी, ता. माण), अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१८ साली वर्धनगड घाटाच्या हद्दीत तानाजी वलेकर हा डंपरमधून विनापरवाना वाळूची वाहतूक करताना मिळून आला. सचिन राजगे यानेही कारवाई करू नये, असे कटगुणचे तत्कालीन तलाठी किरण पवार यांना सांगितले डंपर वळवून घेतो असे सांगून त्यांनी वाळूसह कोरेगाव बाजूकडे पलायन केले. घाटाखाली रामोशीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाळू खाली करून जाणाऱ्या डंपरला थांबवण्यासाठी गेलेल्या तलाठी आणि साक्षिदारांना शिवीगाळ करत गाडीखाली चिरडून मारण्याची धमकी आरोपीने दिली होती. डंपर अंगावर घालण्याचा प्रयत्नही केला होता.

राजगे याने फिर्यादींना धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा आणला होता. जानेवारी २०१८ मध्ये याबाबत पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तत्कालीन सपोनि संभाजी गायकवाड यांनी या गुन्ह्याचा तपास करुन आरोपींना अटक आणि साक्षिदारांचे जबाब नोंदवले होते. वडूज येथील जिल्हा न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. डीवायएसपी गणेश किंद्रे व सपोनि संदीप शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात आली. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील अजित कदम व श्रीमती अनुराधा निंबाळकर यांनी काम पाहिले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. वाय. काळे यांनी दोन्ही आरोपींना कोर्ट उठेपर्यंत साधी कैद आणि प्रत्येकी २० हजारांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिने जादा शिक्षा सुनावली. सरकारी वकीलांना एएसआय बी दत्तात्रेय जाधव, पो. ह. दडस, पो. कॉ. अक्षय शिंदे, जयवंत शिंदे, सागर सजगणे यांनी सहकार्य केले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here