



भारतात प्रत्येक राज्यात,जिल्ह्यात संस्था,संघटना आणि राजकीय पक्ष यांचे मुबलक प्रमाणात निर्मिती करण्यात आली होती. त्यात आम्ही जात धर्म मानत नाही असे सांगणारे ही जाती पोट जातीच्या संघटना आणि त्यांचे राष्ट्रीय पातळीवर महासंघ निर्माण करत होते. त्यातील प्रत्येक नेता हा कोणत्यानां कोणत्या पक्षाचा व विचारधारेचा शिष्य भक्त होता. त्याला त्यांच्या आर्थिक गरज भागविणाऱ्या सुविधा मिळत होत्या.त्यामुळेच तो खाऊन पिऊन तंदुरुस्त होता.माझी समस्या सुटलीना बाकी समाजाचे बिनधास्तपणे शोषण होऊ द्या मला त्याचे काही घेणेदेणे नाही. संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे तो त्यांच्या विभागात व समाजात कट्टर विचारधारा मानणारा असतो.त्यांच्या विरोधात त्यांच्या समाजातील लोकांनी आवाज उचलला तर त्याला पोलिसांनी विविध मार्गाने त्रास दिलाच समजा.यामुळेच हा प्रत नसलेला माणूस संघटनेच्या पदाचा गैरवापर करून मोठा होतो. आणि विचारधारेचा खूनच करतो.राजकीय पद प्रतिष्ठा आणि पक्ष संघटना त्याचा योग्य वापर करून घेतो.
असंघटित कामगारांसाठी काम करीत असतांना आम्ही नाक्यावर पेंटर,कडीया मिस्त्री,बांधकाम करणारा बिगारी काम करणारे मजूर यांना संघटनेची पदे दिली. नाक्यावर कामगार,मजुरांना संघटनेमुळे पद व प्रतिष्ठा मिळते.नंतर तो आपल्या नगरात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या नजरेत भरतो, मग ते त्याला जवळ करतात.त्यामुळे आपोआप कार्यक्रमाला प्रेषक मिळतात व गर्दी दाखविण्यात यशस्वी होता येते.स्टेजवर त्याला चार शब्द बोलता आले नाही तरी चालतील फक्त स्टेजवरच्या नेत्याने गर्दी जमा केलेल्या या कार्यकर्त्यांचा नांव घेऊन सत्कार केला पाहिजे.एवढीच त्यांची अपेक्षा असते. ती पुरी न झाल्यास तो दुसऱ्याच दिवशी स्वतःची संघटना काढणार किंवा इतर संघटनेत जाऊन ज्या संघटनेमुळे मोठा झाला त्यांची बदनामी करणार.ही विषारी विचार धारा विशिष्ट राजकीय नेत्यांनी विशिष्ट विचारधारेच्या दूरदृष्टीने तयार करून राजकीय पद प्रतिष्ठा आणि पक्ष संघटना मजबूत केली.त्यामुळेच आज देशात बेरोजगारी,महागाई,आरोग्याची शिक्षणाची वाट लागत असतांना पाहिजे तेवढा असंतोष बाहेर निघतांना दिसत नाही.उलट अच्छे दिन असल्याचे गोड स्वप्न सर्वांना दिसते.कारण गल्ली बोळात राजकीय पद प्रतिष्ठा आणि पक्ष संघटना कमजोर होण्या ऐवजी मजबूत होतांना दिसते.आरक्षण मागणाऱ्या जाती त्यांचे महासंघ जातीचे आरक्षण विसरून पुन्हा पुन्हा गर्वसे कहो हम हिंदू है म्हणतांना दिसतात.त्यांना ही राजकीय पद प्रतिष्ठा मिळवून देण्यासासाठी पक्ष संघटना जागरूक दिसते.
हिंदुस्थानात राहणारा कार्यकर्ता भारतातील नसावा म्हणूनच कोणत्याही संघटनेचा कार्यकर्ता कसा असावा व कसा नसावा?.याची तयारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विध्यार्थी दसेतच सकाळी मैदानात काळजीपूर्वक करून घेतो. स्वतःला कार्यकर्ता समजत असाल तर स्वयंपूर्ण अभ्यासु वृत्ती असावी.स्वतःची वैचारिक ध्येय उद्धिष्ट स्पष्ट असावे.तर इतर संघटनेची पक्षाची अंतीम ध्येय, उद्धीष्ट्य समजून घेता येतील.हिंदुराष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्ने दाखविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित सर्व संघटना,संस्था,पक्ष,ट्रेंड युनियन यांचे अंतीम ध्येय,उद्धीष्ट्य स्पष्ट आहे म्हणूनच ते कुठेही जाऊन कोणत्याही संघटनेत काम करीत असले तरी आपले उद्धीष्ट्य विसरत नाही.हे आता भारतातील पुरोगामी,समाजवादी, मार्क्सवादी कम्युनिस्ट,गांधीवादी,गोळवलकरवादी विचारांच्या पक्ष संघटनेत,कामगार युनियन,सामाजिक संस्था,शैक्षणिक संस्था,आर्थिक उलाढाल करणाऱ्या बँक,पतपेढी,संस्था सर्वांनाच अनुभवाने समजले असेल कि राजकीय पद प्रतिष्ठा आणि पक्ष संघटना कसा चालविल्या पाहिजेत.
बहुसंख्येने आदिवाशी विभागात काम करणाऱ्या संघटना ह्या कम्युनिस्ट विचारधारा मानणाऱ्या लालबावट्या वाल्या आहेत.संघटीत व असंघटित कामगारा मध्ये काम करणारे पुरोगामी,समाजवादी,मार्क्सवादी कम्युनिस्ट,गांधीवादी,संघटना,संस्था,पक्ष आपल्या मुख्य ध्येय धोरणा पर्यत पोचत का नाही?. त्यांचे काम कष्टकरी कामगार मजुरांच्या घराघरात असतांना राजकारणात भाजप सेना मनसे कशी काय यशस्वी होते.म्हणजेच संघटनेची तत्वप्रणाली त्यांना मान्य नसावी. त्यांना संघटनेचे अंतीम ध्येय, उद्धीष्ट्य त्याला माहित नसावे.माहिती असेल तर त्या आदिवासी समाजात कुशल संघटक,वक्ता आणि नेतृत्व का निर्माण होत नाही.केवळ आदिवासीच नव्हे तर ओबीसी, अल्पसंख्याक मागासवर्गीय समाजातही परप्रकाशित वक्तृत्व, नेतृत्व खुप आहेत.पण ते अंतीम ध्येय,उद्धीस्टा पर्यत पोचत नाही.कारण त्यांचा आर्थिक स्रोत आणि प्रेरणास्रोत वेगळे आहेत.त्यामुळेच त्यांना समाजाबद्दल किती आपुलकी आहे आणि किती नाही हे ठरविता येत नाही.संघटनेच्या कार्यकर्त्या बद्दल त्याच्या विचारात समता, स्वातंत्र्य,बंधुत्व किती असावे आणि मनात सद्भावना,प्रेम,आदरभाव किती असावा हे निश्चित होत नाही.देशाच्या सर्वोच्य पदी राष्ट्रपती पदी बसून ही त्याला स्वाभिमान आत्मसन्मान मान सन्मान आणि अपमानास्पद वागणूक यातील फरक समजत नसेल तर राजकीय पद प्रतिष्ठा आणि पक्ष संघटना त्यांना काय प्रशिक्षण दिले असेल.
ते उच्चशिक्षित आहेत कि संस्कारानुसार वागणारे मानसिक गुलाम. मग एकच आदर्श,प्रेरणा,श्रध्दा आणि प्रतिके असतांना वेगवेगळे व्यक्तिगत विचारांच्या पक्ष संघटना का निर्माण होतात?.इतिहास वाचला तर इतिहास घडविता व लिहता येतो असे म्हणतात.मग स्वत:च्या समाजाचा पूर्वेतिहास त्याला माहित असावा की नाही?.कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही असे म्हटले जाते.म्हणूनच या देशातील डाव्या विचारांचे पुरोगामी,समाजवादी,मार्क्सवादी कम्युनिस्ट,गांधीवादी,संघटना,संस्था,पक्ष आपल्या मुख्य ध्येय धोरणा पर्यत पोचत नाही.कारण ते प्रथम हिंदुत्ववादी असतात. ते नेहमीच जाहीर स्टेजवर आम्ही जात,धर्म,पंथ,प्रांत मानत नाही असे जाहीर पणे बोलतात व लिहतात. पण योग्य वेळी योग्य ठिकाणी दर्शन घेतल्या शिवाय राहत नाही.यांच्या या आचरणा विरोधात बोलणारा,लिहणारा कार्यकर्ता विद्रोही,जातीवादी ठरतो.आज भारत हिंदुस्थान बनण्याच्या मार्गावर निपक्ष निवडणुकीत प्रशासकीय यंत्रणेचा उघड खून करून यशस्वी वाटचाल राजकीय पद प्रतिष्ठा आणि पक्ष संघटना यामुळेच करीत आहे.निपक्ष निर्भीड लोकशाही हुकुमशाहीत बदलली आहे.
✒️सागर रामभाऊ तायडे(भांडुप मुंबई,अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना)मो:-9920403859


