




✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.30मार्च):- नगरपरिषद परिसरात दि.२९ मार्च मंगळवार रोजी नवीन एका अग्नीशमन वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.अग्नीशमन वाहनाच्या लोकार्पण सेवे करिता शासनाकडून ८६.५६ लक्ष रूपयाची निधी प्राप्त झाली.तसेच दलित सुधार योजनेसाठी शासनाकडून ३२.४७ लक्ष रूपयांची निधी प्राप्त झाली असुन या अंतर्गत वार्ड क्र. ६ मध्ये विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.यावेळी बोलतांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हनाले घुग्घुस शहरातील विकासकामे करण्याकरिता तितक्या प्रमाणात शक्य होईल निधी उपलब्ध करून देण्यात येणार तेवढेच प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.आमदार किशोर जोरगेवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रास्ताविक घुग्घुस नगर परिषद मुख्याधिकारी अर्शीया जुही यांनी केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री श्री. विजय वडेट्टीवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.किशोर जोरगेवार, प्रशासक श्री.निलेश गौड, मुख्याधिकारी अर्शीया जुही, पोलीस निरीक्षक बी.आर पुसाटे,कॉंग्रेस कमिटीचे चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे,कॉंग्रेस नेते रोशन पचारे,जावेद सिद्दीकी, पवन आगदारी, यंग चांदा ब्रिगेडचे नेते इमरान खान मंचावर उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ, श्रीफळ,व शाल देवुन करण्यात आले.यावेळी नगर परिषदचे विठोबा झाडे,सुरज जंगम, दिनेश बावणे,शंकर पचारे,हरी जोगी,विक्रम क्षिरसागर, कर्मचारी, पत्रकार बंधु व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.




